धनगर आरक्षण लढ्यातील गुन्हे मागे घ्या - आमदार गोपीचंद पडळकर

 धनगर आरक्षण लढ्यातील गुन्हे मागे घ्या - आमदार गोपीचंद पडळकर ,जालन्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करा आमदार पडळकर यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन 



पाताळगंगा न्यूज :  दत्तात्रय शेडगे                            खालापूर : २४ नोव्हेंबर,

                    एकीकडे धनगर आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असताना २१  नोव्हेंबर रोजी झालेल्या जालना जिल्ह्यातील समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढला होता ,मात्र जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ कुष्णनाथ पांचाळ यांनी निवेदन स्वीकारले नसल्याने समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील काचा फोडून दुचाकी फोडल्या या घटनेने पोलीस प्रशासनाने ३६  बांधवांवर गुन्हे दाखल केले असून ते गुन्हे मागे घेऊन जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची कठोर चौकशी करून कारवाई करावी  अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे                    गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाज आपल्या संविधानिक अधिकारापासून वंचित आहे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश केला मात्र महा आघाडी सरकारने हेतुपुर्वक धनगर आणि धनगड असा गोंधळ निर्माण केला मात्र  राज्यात महायुतीचे  सरकार आहे या सरकार कडून धनगर आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे, मात्र आरक्षण अंमलबजावणीसाठी ५०  दिवसांची मुदत उलटून गेली आहे                                    जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.कुष्णनाथ पांचाळ यांना निवेदन देण्याच्या एक दिवस आधी याची माहिती देण्यात आली, त्यांनी निवेदन स्वीकारन्याची तयारीही दर्शविली होती मात्र ऐनवेळी निवेदन स्वीकारले नाही त्यांनी संवेदनशील पणाने हा विषय हाताळायचा होता मात्र त्यांनी हेतुपूर्वक समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष केले आणि यामुळे समाज बांधवांच्या भावना तीव्र उमटल्या याला सर्वस्वीपणे जालन्याचे जिल्हाधिकारी जबाबदार आहेत त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे,

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण