राजिप शाळेतील विद्यार्थी गिरवणार डिजिटलचे धडे ,
जिल्हा नोडल अधिकारी,राजिप शाळा वडगाव मुख्याध्यापक - सुभाष राठोड यांची नियुक्ती
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
आलिबाग : २५ एप्रिल,
रायगड जिल्ह्याचा आलेख दिवसेंदिवस कमी होत असतांना त्यांची पटसंख्या वाढावी तसेच आताचे युग हे डिजिटल होत असतांना लहान मुले सहजपणे मोबाईल हातालत असतात.यामुळे विद्यार्थ्यांना आभ्यास सोपे व्हावे,शिवाय एका क्लिक वर शिक्षणांची दारे खुली व्हावी या उद्दात विचारांतून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ. भरत बास्टेवाड,भारतीय प्रशासन सेवा यांच्या संकल्पनेतून,पुनिता गुरव शिक्षणाधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली,मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद,अलिबाग - नेहा भोसले यांच्या हस्ते या डिजिटल ॲप चे आनावरण करण्यांत आले.
या मध्ये शिक्षणांचा पायाभूत,पूर्वतयारी, माध्यमिक स्तर रचनेनुसार अध्ययन, अध्यापन ,खेळ कृती,सहशालेय उपक्रम,स्पर्धा परीक्षा,माझा अभ्यास,तंत्रशिक्षण असे मुख्य पेज असून या पुढे विषय व अध्ययन निष्पत्तीनिहाय दैनंदिन पाठ योजना,सहायक उपक्रमाची यामध्ये रचना करण्यांत आली आहे.या ॲप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ग्रेडिंग अचूक व थेट करणे सुलभ होणार आहे.
या शैक्षणिक ॲपचे अति मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे,मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम,शिक्षणाधिकारी- पुनिता गुरव,यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या उपक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून राजिप शाळा वडगांव चे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन अध्ययन अध्यापन करणे सुलभ होणार असून व्हिडिओ, कृतिपत्रिक,क्विज, असे कार्य या ॲप च्या माध्यमातून सुलभ होईल असा विश्वास आहे.शिक्षणाधिकारी प्राथमिक रायगड जिल्हा परिषद, अलिबाग - पुनिता गुरव, यांनी व्यक्त केला.
0 Comments