कंपनी कामगारांना धमकावत असेल तर त्या मॕनेजमेंटला पण वठणीवर आणण्याची ताकद आमच्यात आहे - आमदार प्रशांत ठाकुर

 कंपनी कामगारांना धमकावत असेल तर त्या मॕनेजमेंटला पण वठणीवर आणण्याची ताकद आमच्यात आहे -  आमदार प्रशांत ठाकुर 



कोप्रान फार्मा कंपनीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेची द्वारसभा (  गेट मिटींग ) संपन्न 

माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : २६ एप्रिल, 

          कंपनी मॕनेजमेंट जर कोणच्या तरी पदरा आड येवून कामगारांना वेटीस अथवा धमकावण्याचे काम करत असेल तर त्यास वठणीवर आणण्याची ताकद आमच्या युनियन मध्ये आहे.असा इशारा कोप्रान कंपनीस बीजेपी नेते तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर यांनी दिला.सावरोली येथील कोप्रान फार्मा लिमिटेड कंपनीत भारतीय जनता पार्टीशी संलग्न असणाऱ्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेची द्वार सभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.
               यावेळी ते पुढे म्हणाले कि कंपनीतील कामगारांवर मॕनेजमेंट कडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच  कामगारांनी एकत्र येवून आमची युनियन स्वीकारली. युनियन ही  कंपनी वेटीस धरण्यासाठी येत नसते. तर कमगारांना न्याय देण्यासाठी होत असते.खालापूर तालुक्यात औषध निर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या सावरोली येथील कोप्रान फार्मा लिमिटेड या कंपनीत साधारण एकशे वीसच्या आसपास कायम स्वरूपी कामगार असून शेकडो कामगार कंत्राटी स्वरूपात काम करतात. सदर कंपनीमध्ये यापुर्वी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियन होती मात्र कामगारांस योग्य तो न्याय मिळत नसल्यामुळे येथील कामगारांनी एकत्र येत  भाजप प्रणित जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्विकारले. 
            
      
   -------------- चौकट   -------------- 
कंपनी बरोबर करार करण्यास वारंवार विलंब होत होता. कामगारांना तेरा महिने पगार मिळाला नाही.मात्र कामगारांस योग्य न्याय मिळावा यासाठी कामगारांच्या हितासाठी जय भारतीय कामगार संघटनेचे नेतृत्व स्विकारले आहे.
कोप्रान कामगार - अमर घोसाळकर 
          


               -------------- चौकट   -------------- 
  या कारखान्यातील अन्याय घडत असेल तर आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून व्यवस्थापक यांस कठणीवर आणू  खळखट्याक उत्तर देण्यात देवू.
    भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष - सनी यादव


             -------------- चौकट   -------------- 
  कामगारांच्या हितासाठी , कोणी अडवा आला तर जशास तसे उत्तर देऊ.आम्ही कामगारांना न्याय देणारे आहोत. त्यांचे खाणारे नाही. तेव्हा कोप्रानच्या कामगारांनी निर्धास्त रहावे. सर्व समस्या सोडविण्यात येतील.
        संघटनेचे अध्यक्ष -  जितेंद्र घरत

Post a Comment

0 Comments

दत्तात्रेय रामचंद्र काठावले यांचे अल्पशा आजाराने निधन