खानाव गावात नागेश्वर पालखी सोहळा,सासरी गेलेल्या मुलींची उपस्थिती.दीपोत्सवाच्या माध्यमातून सांगता

 खानाव गावात नागेश्वर पालखी सोहळा,सासरी गेलेल्या मुलींची उपस्थिती.दीपोत्सवाच्या माध्यमातून सांगता





पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
खालापूर : २५ नोव्हेंबर,

       भगवान नागेश्वर च्या कृपेने रायगड राष्ट्रभूषण पुरस्कृत,गुरुवर्य ह.भ.प.मारुती ( दादा ) महाराज राणे यांच्या आशीर्वादाने तसेच रायगड भूषण पुरस्कृत ह.भ.प.रामदास ( भाई) महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रखुमाई मंदिरात या काकडा  सुरु होते आज दीपोत्सवाच्या माध्यमातून सांगता करण्यात येत असल्यामुळे  गेली ३६ वर्ष काकडा समाप्ती नंतर गावामधून नागेश्वर पालखी सोहळा आयोजित करण्यात आली.विशेष करुन सासरी गेलेल्या सर्व मुली या पालखी च्या निमित्ताने एकत्र येत असतात.ही परंपरा आजही मुली कायम राखत आहे.

                  या खानाव गावात कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात झालेल्या ह्या काकडा आरती गेले महिनाभर पहाटे चार  ते सहा पर्यंत सुरु होत असे,तसेच सायंकाळी सात ते आठ हरिपाठ नित्यनेमाने होत असते.ह.भ.प.रामदास ( भाई) महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड सह खालापूर तालुक्यात मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय असून शिवाय महड येथे गुरुकुल च्या माध्यमातून लहान मुलांच्या वरती संस्कार देण्यांचे काम त्यांच्या माध्यमातून होत असते.यामुळे प्रत्येक गावात होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्यांचे पहावयांस मिळत आहे.

                गेले महिनाभर सुरु असलेल्या काकडा आरती आज संपूर्ण गावामधून नागेश्वर पालखी फिरवून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमास आलेल्या वारकरी ग्रामस्थ यांस महाप्रसाद रितेशशेठ आहुजा,पी.एस स्टिल - खानाव,नथुराम मोरु मोगारे,कै.नाना सखाराम पाटील,वै.पार्वती नाना पाटील,- खानाव,यांच्या स्मरणार्थ - कै.संतोष नाना पाटील,भरत नाना पाटील,त्याच बरोबर रात्री १० वाजता भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर