उपसरपंच चषकाचा मानकरी ठरला बापदेव मित्र मंडळ

 उपसरपंच चषकाचा मानकरी ठरला बापदेव मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक पटकावीला सोमजाई माता चावणी संघाने....



माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २९ एप्रिल,

            चावणी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुखदेव भोसले यांचा वाढदिवसाचे औचित्य साधतं उपसरपंच चषक, (२०२५  ) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ह्या स्पर्धा  गारमाळ येथे पार पडल्या, 
         चावणी ग्रामपंचायत मर्यादित ह्या स्पर्धा असून  या स्पर्धेत एकूण दहा संघांनी सहभाग घेतला होता.या सामन्यात प्रथम क्रमांक बापदेव मित्र मंडळ तर द्वितीय  क्रमांक सोमजाई माता प्रसन्न चावणी तर तृतीय क्रमांक आदिवासीवाडी चावणी यांनी पटकावीला, या सर्व संघाना राष्ट्रवादी कॉग्रेसचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या हस्ते पारितोषित आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, 
        उपसरपंच  सुखदेव भोसले हे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून सुधाकर घारे यांचे कट्टर समर्थक आहेत.चावणी ग्रामपंचायत मध्ये त्यांना मानणारा मोठा तरुण वर्ग असून ते या दुर्गम भागातील जनतेला नेहमी मदत करत असतात, त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने अनेक मान्यवरांनी  कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

हर्ष गणेश पाटील दहावी मध्ये  ९०.६० टक्के, ,टी.एन.एम.पब्लिक स्कुल आसरोटी येथे प्रथम