गृप ग्राम पंचायत माजगांव उप सरपंच राजेश पाटील यांचा अभिष्ठचिंतन उत्साहाने साजरा,

 गृप ग्राम पंचायत माजगांव उप सरपंच राजेश पाटील यांचा अभिष्ठचिंतन उत्साहाने साजरा,





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली : २९ नोव्हेंबर 

                गृप ग्राम पंचायत माजगांव नवनिर्वाचित उप सरपंच राजेश पाटील यांचा अभिष्ठचिंतन त्यांच्या निवास स्थांनी माजगांव येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.यावेळी सामाजिक,शैक्षणिक,राजकिय,तसेच       ग्रामस्थ उपस्थित होते.राजेश पाटील यांचा चाहता वर्ग खूप असून,तसेच त्याचा स्वभावामुळे तालुक्यात अनेक माणसे जोडली गेली असल्यांचे पहावयांस मिळत आहे.काल झालेल्या या अभिष्ठचिंतन सोहळ्यांस तरुण वर्गांची उपस्थिती पहावयांस मिळाली,

     

            नुकताच झालेल्या या निवडणूकीत ते निवडून आल्यामुळे त्यांस उप सरपंच होण्यांचा मान त्यांस मिळाला आहे.या अगोदर सुद्धा त्यांनी उप सरपंच पद भुषविले होते.त्याच बरोबर त्यांचा राजकीय अनुभव दांडगा असून,ते सातत्याने तालुक्यासह,या परिसरात होत असलेले कार्यक्रमात सातत्याने सक्रिय असल्यांचे पहावयांस मिळत असतात.एक तरुण,पुढारी,दानशून व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात आहे.यामुळे पाटील यांच्याकडे तरुण वर्ग,जेष्ठ नागरिक एक आपुलकीच्या भावनेतून पाहिले जाता आहे.तसेच ते लोकप्रतिनीधीचे निकट वर्तिक असल्यांचे बोलले जाते.


                त्यांच्या या अभिष्टचिंतांच्या सोहळ्यांस खालापुर तालुका प्रमुख शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) एकनाथ पिंगळे,तांबाटी नवनिर्वाचित सरपंच - अविनाश आबले,सामाजिक कार्यकर्ते - नरेश पाटील,यशवंत शिंदे,मंगेश महाब्दि,अनंता लभडे,राजेश पाटील,संदिप पाटील,मारुती ढवाळकर समिर काठावले,निलेश ढवाळकर,भरत जाधव,चंद्रकांत जाधव,राजेश महाब्दि,संदिप महाब्दि,सुरेश महाब्दि,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 








Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर