कै.सुभाष (आप्पा )बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
पाताळगंगा न्यूज : दिपक जगताप
खालापूर : ३० नोव्हेंबर
भगवान मारूती भोईर यांच्या जेष्ठ कन्या ॲड. कृतिका उदित नाईक- भोईर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कै. सुभाष (आप्पा )बाबू पाटील (आजोबा) यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळा मोहरई पाडा व जिल्हा परिषद शाळा आडोशी येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. ह्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत होता.
कै.सुभाष (आप्पा )पाटील यांच्या आठवणींना उजाळा मिळावा हेच कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. आप्पाना सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करण्याची फार आवड होती त्यांच्या ह्या संस्कारातून आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत असे ॲड. कृतिका उदित नाईक - भोईर यांनी सांगितले.
ह्यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र लक्ष्मण सोनावणे, शिक्षीका संध्या सुभाष घोलप मोहरई शाळा.शिक्षिका सौ संगीता म्हात्रे आडोशी शाळा तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
0 Comments