काल्यांच्या किर्तनांच्या माध्यामातून माजगांव येथिल काकडा आरतीची सांगता

 काल्यांच्या किर्तनांच्या माध्यामातून माजगांव येथिल काकडा आरतीची सांगता 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव /आंबिवली : २७ नोव्हेंबर 

                   महाराष्ट्र ही संताची भूमी आहे.त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत,त्यांचे नामस्मरण,कीर्तन भजन,काकडा आरती आदि कार्यक्रम सातत्याने ग्रामीण भागात सुरूच असते.कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात झालेल्या माजगांव येथिल काकडा आरती, आज राजेश महाराज सावंत - खांबेवाडी (उंबरे) यांच्या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगता करण्यात आली. महिनाभर महिला मंडळ,तरुण वर्ग,जेष्ठ नागरिक,विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये ,पहाटे चार ते सहा पर्यंत काकडा आरती संपन्न होत होती.ग्रामस्थांचा मंदिरात पहाटेच्या मंद गारव्यामध्ये सुंदर असे काकडा आरती बोल ऐकण्यास मिळत असल्यामुळे मनाला समाधान वाटत असल्याचे पाहावयांस मिळत होते. 

                      माजगांव येथील बहुसंख्येने ग्रामस्थ वारकरी सांप्रदायातील असल्यामुळे रोज नित्यनेमाने काकडा आरती सुरु असून पहाटेचा मंजुळ ध्वनी प्रत्येकांच्या कानावर पडत होते.आज बदल्या काळात माणसे जरी बदलत असली तरी सुद्धा ग्रामीण भागात भारतीय संस्कृती जोपासण्याचे काम सातत्याने सुरूच असते.वर्षातून एकदाच महिनाभर सुरु होत असलेल्या या काकडा आरतीस बहुसंख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित राहून त्या विठ्ठलाचा काकडा आरतीच्या माध्यमातून जयघोष सुरू असल्याचे पाहावयांस मिळाले. 
                     

      काकडा आरतीच्या समाप्तीला महाप्रसाद ग्रामस्थ मंडळ माजगांव यांच्या माध्यमातून देण्यात आले.तसेच कीर्तनारूपी     सेवेचे सौजन्य ग्रुप ग्राम पंचायत माजगांव नवनिर्वाचित सरपंच दीपाली नरेश पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.आणि आज ह्या काकडा आरतीची समाप्ती करण्यात आली. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर