मराठा समाजाला आरक्षण द्या ,सकल मराठा समाज रायगड यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : ३० नोव्हेंबर,
सकल मराठा समाज रायगड जिल्हा वतीने राज्य समन्वयक डॉ.सुनिल पाटील यांसह रायगड जिल्ह्यातील मुख्य समन्वयक आणि स्थानिक समन्वयक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देऊन मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी केली आहे,
यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी अनेक वर्ष लढा देत आहे.त्यामुळे अनेक वर्षांचा मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवावा.मराठा योद्धा मनोज जरांगे यांची रायगड मध्ये लाखोंची सभा झाली असून सकल मराठा समाज रायगड पूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम आहे जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिलेल्या मुदतीत २४ डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रश्न सोडवावा. तसेच सरकार मधील मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करीत असून दोन समाजात वाद लावण्याचे काम करीत आहेत. त्यांना आवर घाला अशा मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित दादा यांना सकल मराठा समाज रायगड जिल्हा वतीने देण्यात आले.
यावेळी राज्य समन्वयक डाॅ.सुनिल पाटील,मंगेश दळवी, शंकर थोरवे ,मधुकर घारे ,उत्तम भोईर,प्रभाकर देशमुख ,शशिकांत मोरे ,संतोष बैलमारे ,रमेश पाटील,मारुती खाने,अनिल पिंगळे,प्रकाश पालकर ,उमेश म्हसे ,प्रदिप सुर्वे ,मंगेश पाटील ,नंदु मोरे ,नंदु शिर्के,शिरीष मानकावळे, धनंजय थोरवे,संतोष पाटील ,सुरेश बोराडे,बजरंग श्रीखंडे,प्रमोद खडे, कैलास म्हामले आदी उपस्थित होते.
0 Comments