डॉ.श्रीनिवास वाळिंबे यांस जिवन गौरव पुरस्कार,लोकमान्य टिळक मोफत वाचनालय च्या माध्यामातून सत्कार
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
चौक : २७ नोव्हेंबर
चौक या बाजार पेठेत नामवंत डॉक्टर म्हणून प्रचलित असून,रुग्णांना देत असलेल्या सेवामुळे डॉ. वाळिंबे यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.गेली ६० वर्ष आरोग्य सेवा बजावत असतांना रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनचा च्या माध्यमातून त्यांस जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यांत आले.मात्र त्यांना मिळालेला पुरस्कार हे त्यांनी केलेली उत्तम सेवेचा सन्मान असल्यांचे बोलले जाते.
लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक च्या कार्यकारणीच्या माध्यमातून अध्यक्ष - सुरेश वत्सराज यांच्या माध्यमातून डॉ. वाळींबे यांचा सत्कार सामारंभ चे आयोजन भास्कर रघुनाथ पेंडसे सभागृहात येथे करण्यात आला.चौक बाजार पेठेतील प्रतिष्ठित व्यापारी धर्माशेट ओसवाल यांचा हस्ते शाळ,श्रीफळ,पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे डॉ.वाळींबे हे मोफत वाचनालय चौक हे कार्यकारणी सदस्य आहेत.
यावेळी उपस्थित मान्यवर आणी कार्यकारणी यांनी आपल्या मनोगतात उत्तम आश्या भावना व्यक्त केल्या.यावेळी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हर्षल हनुंमंते,ग्रंथपाल - अभिजित चौधरी,रजनीकांत शहा,सतीश आंबावणे,मुरलीधर साखरे,मनोज साखरे,राजन चौधरी,अजिंक्य चौधरी,अशोक चौधरी,राजेश आंबवणे,जयश्री चोगले,ऐश्वर्या जोशी,डॉ.अपर्णा वाळिंबे,अदि उपस्थित होते.
कोट
डॉ.श्रीनिवास वाळिंबे गेली ६० वर्षे रुग्णांची सेवा करीत आहेत.त्याचे चीज झाले असून त्यांस उत्तम फळ मिळाले,शिवाय या मोफत वाचनालयांस त्यांचे मार्गदर्शन आम्हास वेळोवेळी लाभत आहे.त्यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेल्या उत्तम कामाचे स्वरुप आहे. ( लो.टि.मो.वा. अध्यक्ष - सुरेश वत्सराज )
0 Comments