तळा तालुक्यात भारतीय राज्यघटनेचा संविधान दिन साजरा

 तळा तालुक्यात भारतीय राज्यघटनेचा संविधान दिन साजरा 



पाताळगंगा न्यूज : कृष्णा भोसले 
तळा : २६ नोव्हेंबर 

            भारतीय बौद्ध महासभा तळा,बौद्धजन पंचायत समिती शाखा तळा व उपशाखा तसेच बौद्धजन सेवा संस्था (रजि.) रायगड या तिन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर, २०२३ रोजी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 

        सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक आयु. सदानंद येलवे हे होते. यानिमित्ताने सकाळी ११.३० वाजता तळा शहरातील भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी समता सैनिक दलाच्या व उपस्थित भीम अनुयायी यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.     

                   सामुदायिक रित्या बुद्ध पूजा पाठ घेण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच तालुक्यातून उपरोक्त तिन्ही संस्थेचे तालुका पदाधिकारी व शेकडो सभासद बंधू - भगिनी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर