शिंदीवाडी मोरे कुटुंबियांच्या कुलदेवतेचा अभिषेक कार्यक्रम संपन्न

 शिंदीवाडी मोरे कुटुंबियांच्या कुलदेवतेचा अभिषेक कार्यक्रम संपन्न  (त्रिपूरारी पौर्णिमा निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन)





पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : २७ नोव्हेंबर 

                राजे चंदरराव मोरे यांच्या वंशातील काही लोक कोयना धरणाच्या विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीमुळे विस्थापित झाले आहेत.यातील बहुतांश लोक खालापूर तालुक्यातील विविध भागात समुहाने राहत आहेत.या लोकांच्या कुलस्वामिनी देवीचा अभिषेक दरवर्षी संपन्न होत असतो.यंदा हा कार्यक्रम सोमवारी त्रिपूरारी पौर्णिमेनिमित्त संपन्न झाला.कुलदैवतेची यथोचित पूजा अर्चा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाला मोरे कुलातील बहुतांश कुटुंब आपल्या परिवारास उपस्थित होते.
                 मुळ सातारा जिल्हा,जावळी तालुक्यातील शिंदी या गावातील हे कोयना प्रकल्पग्रस्त लोकांचा समुह खालापूर तालुक्यातील परखंदे या गावा शेजारी स्वतंत्र जमीन खरेदी करून या लोकांनीं स्वतःची घरे बांधली आहेत.या लोकांची आपल्या कुलदैवतेवर, ग्राम देवतेला मोठी श्रध्दा असल्याचे पहायला मिळते.यामुळे यांच्या प्रत्येक गावात ग्राम देवतेचे स्वतंत्र असे मोठे देऊळ पहायला मिळते.या मंदिरात वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम संपन्न होत असतात.धार्मिक स्वभावाच्या या लोकांना मानसिक समाधानासाठी एकत्र येऊन देवदेवतांची मनोभावे पूजा अर्चा करण्याची मुळातच आवड असल्याने हे लोक पूर्वापार पध्दतीने चालत आलेल्या रूढी परंपरा जोपासण्याचे काम करतांना दिसतात.
               यात कोणत्याही प्रकारची अधंंश्रध्दा नसल्याचे सांगून देव देवतांवर निःसंदिग्ध प्रेम करणे ही आपली पूर्वजात परंपरा आहे.या परंपरेनुसार आपल्याला मानसिक, शारिरीक समाधान मिळत असेल तर ती सेवा करायला काहीच हरकत नसल्याचे या मंडळींनी सांगितले.भावकीतील प्रमुख आत्माराम शिवाजीराव मोरे,दीपक तुकारामराव मोरे, विलास भगवानराव मोरे,सुभाष सखारामराव मोरे, जगन्नाथ दत्तारामराव मोरे, प्रकाश सितारामराव मोरे, आबासाहेब सखारामराव मोरे आदींसह मोरे कुटुंबातील कुलस्वामिनी भावकीतील सर्व नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर