अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य - आयपीएस बिरदेव डोणे

 अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य  - आयपीएस बिरदेव डोणे    



माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २९ एप्रिल,


           अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व उल्लेखनीय  ठरेल असे प्रतिपादन आयपीएस बिरदेव डोणे यांनी केले ते              अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे वतीने  सत्कार समारंभ यमगे ता.कागल येथे केला त्या प्रसंगी बोलत होते.आयपीएस बिरदेव डोणे यांनी नको बुके नको हार फक्त वह्या पुस्तके आणा असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्यांदा कराडच्या अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने यमगे  येथील ५०  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप बिरदेव डोणे यांचे शुभहस्ते करण्यांत आले.
                याप्रसंगी डोणे म्हणाले की आजही गोरगरीब वंचित घटकातील डोंगर दर्या खोऱ्यातील मेंढपाळ यांची मुल शिक्षणापासून वंचित आहेत शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही कितीही संकटे आली तरी जिद्द चिकाटी आणि मेहनत घेऊन यश मिळवता येते आजही बहुजन समाज शिक्षणापासून वंचित आहे.आजही पुरोगामी महाराष्ट्रात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.हे दुर्दैव असून, त्यासाठी कराडचे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे माध्यमातून शैक्षणिक चळवळीला बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे उल्लेखनीय कामगिरी ते करीत आहे.
              मी अहिल्यादेवी ट्रस्टचे नाव ऐकुन होतो अहिल्यादेवी ट्रस्ट नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आहे कोरोना सारख्या महाभयंकर संकट काळात ट्रस्टने डोंगर दर्या खोऱ्यातील जंगलातील मेंढपाळ बांधव यांचे मुलानं साठी चांगले काम केले आहे विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा रायगड जिल्ह्यातील डोंगरी भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणेचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
         आपणं सर्व जण शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ या बहुजन समाजातील जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी बनवण्यासाठी नजीकच्या काळात करु या यासाठी अहिल्यादेवी ट्रस्टला सर्वोतोपरी सहकार्य करु शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. म्हणुन शिक्षणाची कास धरून आपली प्रगती साधली पाहिजे,तरच समाजाचा विकास होईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.                        या प्रसंगी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ बाळासाहेब पुकळे डॉ. मच्छिंद्र गोरड,प्रा.हेमंत पुकळे,संजय कात्रट, लता पुकळे, प्रा.स्वाती वाघमोडे, गजानन हुलवान,सतिश थोरात, आकाश हुलवान,अनिल हुलवान,विजय मालकर,पुनम पुकळे,अभिनंदन हराळे,पांडुरंग गावडे,योगिता घुले, अनिल हजारे,अमर गोरड,नरेश डोणे, विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते.    


Post a Comment

0 Comments

युवा नेते संतोष घाटे यांचा वाढदिवस साजरा,अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा