कुंभिवली ग्रामपंचायत प्रभाग क्र. १ मध्ये ग्रामविकास आघाडीला मतदार राजाची पसंती

 कुंभिवली ग्रामपंचायत प्रभाग क्र. १ मध्ये ग्रामविकास आघाडीला मतदार राजाची पसंती 



पाताळगंगा न्यूज : राज साळुंखे     

                          खोपोली : २ नोव्हेंबर,

                  खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायती पैकी कुंभिवली ग्रामपंचायत पण एक असून या ग्रामपंचायतीचे निवडणूकीचे बिगुल वाजले असून सर्व उमेदवार प्रचार मध्ये मग्न आहे.या ग्रामपंचायत मध्ये मागील अनेक वर्षे राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर गायकवाड यांची सत्ता होती गेले अनेक वर्षे त्यानी आपले वर्चस्व या ग्रामपंचायतवर ठेवलं होतं परंतु गेल्या निवडणूकी मध्ये सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या त्याच्या पत्नीचा प्रभाव झाला होता व या ग्रामपंचायतवर शिवसेना पक्षाच्या सरपंच पदाच्या उमेदवार विजयी झाल्याने त्याची विजयाची परंपरा खंडित झाली होती.                                                                                   या वेळी कुंभिवली ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये ग्रामविकास आघाडी विरुद्ध ग्रामविकास परिवर्तन आघाडी अशी सरळ लढत होताना दिसत असून प्रभाग प्रभाग क्र. १ मध्ये ग्रामविकास आघाडीचे उमेदवार प्रचारात आघाडीवर असून सर्वसाधारण प्रवर्गात संतोष नारायण मुंढे विरुद्ध तुषार ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यात चुरशीची लढत होणार असे चित्र दिसत आहे. ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार हेमा भगवान वीर ,अनुसूचित जमातीचे उमेदवार राकेश दत्तु पवार ,नागरिकांचा मागास प्रवर्गच्या महिला उमेदवार सीमा संतोष चिले यांना प्रभाग क्रमांक १ मध्ये मतदार राजाची पसंती असल्याचे दिसून आली ....

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात