पहल’चा द्वितीय दीक्षांत सोहळा

 पहल’चा द्वितीय दीक्षांत सोहळा,तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान




पाताळगंगा न्यूज : दिपक जगताप
खालापूर : १ नोव्हेंबर,

                       पहल – नर्चरिंग लाईव्स ही एक सामाजिक संस्था आहे, जी शिक्षणा पासून वंचित राहिलेल्या  तरुणांसाठी काम करते. ट्रेनिंग चे सर्व टप्पे पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या तरुणांचा २९ ऑक्टोबर रोजी दीक्षांत समारंभ' पार पडला.
यावेळी खालापूर तालुक्याचे तहसीलदार  आयुब तांबोळी, धामजी ट्रस्टचे  भारत भाई विरानी, माजी नगराध्यक्ष  शिवानी ताई जंगम, खालापूर तालुक्याचे उपनगराध्यक्ष  संतोष भाई जंगम,  डॉ. सोनावणे आणि पहल चे मेंटॉर  श्री. विनोद मेनन आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी  ७६ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, ज्यामध्ये नर्सिंग असीस्टन्ट, मोबाइल रिपेयरिंग टेक्नीशियन  आणि इलेक्ट्रीशियन कोर्सेसचे विद्यार्थी होते. तांबोळी आणि  शिवानी ताई या दोघांनीही संस्थेच्या कामाचे खूप कौतुक केले आणि अश्या कामामुळे युवकांमध्ये कसे परिवर्तन होत आहे हे बऱ्याच उदाहरणानी व्यक्त केले.
             बहुतांश विद्यार्थी खालापूर, खरसुंडी, माडप  ठाकूरवाडी, वायाळ आणि सावरोली या गावातील होते. कार्यक्रमामध्ये तहसीलदार मा आयुब तांबोळी आणि भारत भाई विरानी यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी  सक्षमीकरण प्रवासा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. विशेष कौतुकास्पद म्हणजे या कार्यक्रमात नर्सिंग असीस्टन्ट चा कोर्स केलेले मुलं आणि मोबाइल रिपेयरिंग टेक्नीशियन चा कोर्स केलेल्या मुली समाजातील रूढी वादींना मात करून आपले कॅरिअर बनवत आहेत, हे बघायला मिळाले.
दीक्षांत समारंभाच्या  वेळी संस्थेचे राज्य प्रमुख श्री रोहिदास राठोड यांनी संस्थेचा आढावा सादर केला आणि ट्रेनिंग पूर्ण झाले तरीही संस्था आपल्या विद्यार्थ्यांना कुठलीही मदत करायला त्यांच्या पाठीशी कायम  राहील असे आश्वासन सर्व विद्यार्थ्यंना दिले. संस्थेनी या वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स सुद्धा सुरु केले आहे. 
                  त्या बरोबर आशा वर्करसाठी कॉम्प्युटर ट्रेनिंग चे काम हाती घेतले आहे, पहिल्या बॅचमध्ये २० आशा वर्कर ट्रैनिंग घेत आहेत. या सर्व प्रकल्पासाठी पाठिंबा दिल्या बद्दल अंकुश भारद्वाज यांनी शेठ धामजी लक्ष्मीचंद जैन धर्म स्थानक ट्रस्टचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान