भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडी प्रचाराला मतदार राजांचा उदंड प्रतिसाद
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली , १ नोव्हेंबर
भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या प्रचारांचा वेग वाढला असून मतदार राजांचा उदंड प्रतिसाद पाहवयास मिळत आहे.कारण ग्रुप ग्राम पंचायत माजगांव ची निवडणूक ख-या अर्थाने अस्तित्वाची लढाई सुरु आहे.एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरी कडे भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन असे प्रतिस्पर्धीय उभे असतांना मतदार राजा संभ्रमात असून मात्र या भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडी मध्ये असलेले सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव, माजी सरपंच गोपीनाथ जाधाव,तुकाराम जाधव, सूर्यकांत कांबळे,रमाकांत (भाऊ ) जाधव यांच्या सारखी राजकारणात मुरलेली माणसे असतांना या निवडणुकीत काही होवू शकतो.यामुळे सध्या या मातपगार मंडळींच्या खांद्यावर या प्रचाराची धुरा सांभाळत आहे.
जसे जसे मतदानांचा दिवस जवळ येत असतो,तसे तसे प्रत्येक उमेद्वार यांच्या काळजांचे ठोके वाढत असतात.मात्र भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडी असलेले अनेक हुकुमी एक्का परिवर्तन घडवू शकतील,मात्र मतदार राजा आम्हास दगा देणार नाही.सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेल्या महाविकास आघाडीच्या घोटल्यांचा पर्दाफाश केल्यामुळे आपले पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.यामुळे या निवडणुकीत आम्ही त्यांस जागा दाखवून देणार.
या निवडणुकीत प्रभाग क्रंमाक १ मधून थेट सरपंच पदासाठी उभे असलेली प्रणिता दीपक जाधव,सदस्य साठी सूर्यकांत विठ्ठल कांबळे, कविता प्रकाश जाधव,पूनम प्रकाश जाधव हे ग्रामपंचात मध्ये उभे असून मतदार राजांना दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे या निवडणुकीत आपण बाजी मारणार कारण जनतेच्या समस्यांची जाणीव ज्याला असते तो कधीच पराभूत होत नाही. तो यशस्वी होत असतो असे प्रतिपादन उपस्थित प्रचार रॅलीत सहभागी झालेले पदाधिकारी यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
0 Comments