तरुण वर्गांस प्रशिक्षण समवेत नोकरी, आयईएसपी चा पुढाकार,

 तरुण वर्गांस प्रशिक्षण समवेत नोकरी,आयईएसपी चा  पुढाकार, 

ऐरावत समूह शैक्षणिक आणि उद्योग,आरोग्य सेवा मध्ये अग्रेसर,




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खोपोली : २२ डिसेंबर,

                तरुण वर्गांस नोकरी मिळावी यासाठी सातत्याने धडपडत असतो.मात्र हवी तशी नोकरी मिळत नसते.यासाठी आयईएसपी माध्यामातून आजवर मुले विमान वाहतूक, आरोग्यसेवा, आदरातिथ्य, रस्ता सुरक्षा आणि लॉजिस्टिकमध्ये अश्या विविध ठिकाणी रुजू झाले आहे.आज पाली फाटा -टोल नाका येथे पत्रकार परिषद घेवून आपल्या कंपनीचे कार्य सांगण्यात आले.यावेळी जिल्ह्यासह अनेक राज्यातील तरुण वर्ग या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असून ३ ते ९ महिने प्रशिक्षण देवून आम्ही त्यांस नोकरीला लावत असल्यांचे सी.एम.डी.- ए.एस.खन्ना यांनी पत्रकरांशी बोलतांना सांगितले.
             

    यावेळी विविध क्षेत्रामध्ये रुजू झालेल्या तरुण वर्गांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी युगांत आंबावणे यांनी खास मराठी शैलीत आपले मनोगत व्यक्त केले.व या कंपनीचे आभार मानले.आयईएसपी अंतर्गत ऐरावत ही शाखा असून या माध्यमातून आज पर्यंत जवळ - जवळ पंद्राह हजार पेक्षा जास्त अधिक विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या प्रशिक्षित देण्यात आले.आज ते नोकरी मध्ये स्थिर झाले आहे.त्याच बरोबर  मुंबई सारख्या प्रमुख मेट्रो विमानतळांवर बावीस हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न मिळत असल्यांचे सांगितले.खालापूर येथे बारा एकर या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये विमानचालक,आदरातिथ्य, आरोग्य सेवा, रस्ता सुरक्षा आणि लॉजिस्टिक, नोकरीसाठी व्यावहारिक प्रशिक्षण दिले जात आहे.

                   त्याच बरोबर के.एम.सी कॉलेज खोपोली येथिल पन्नास विद्यार्थ्यांना ही कंपनी प्रशिक्षण देत आहे.तसेच  दर महिन्याला  पाचशे हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.यामध्ये दहावी ते पदविधर असलेले तरुण वर्गांना आवड नुसार विविध क्षेत्रामध्ये समाविष्ठ झाले आहे.यावेळी - सी.ई.ओ.ग्रेय खन्ना,के.टी.एस.पी.चेअरमेन - संतोष जंगम,मा.नगराध्यक्षा - शिवानी  जंगम,ग्लोबल - मनिष कौल,मारीया मॅथिव अदि उपस्थितांनी पत्रकारांना या कंपनी करीत असलेले कार्य सांगण्यास आले. 


Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण