वारकऱ्यांचा वारसा जपत भजनी मंडळ यांस मा.सरपंच शेखर पिंगळे भजनी साहित्य वाटप

 वारकऱ्यांचा वारसा जपत भजनी मंडळ यांस मा.सरपंच शेखर पिंगळे भजनी साहित्य वाटप


वाढदिवसाचे औचित्य साधून हरिपाठ मंडळाला दिले भजनी साहित्य


पाताळगंगा न्यूज : नवज्योत पिंगळे
खालापूर : २३ डिसेंबर,

                    घोडीवली गावातील मा.सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नावंढे गावातील हरिपाठ मंडळ यांस टाळ,विणा, मृदंग हार्मोनियम स्वखर्चातून वाटप करण्यात आल्यांने वारकरी मंडळीने आपल्या हातून आशिच समाजकार्य होवे,आपण यशवंत व्हावे असा अशिर्वाद दिला.
                    वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणारा खालापूर तालुक्यात असून,ग्रामीण भागात भजन, किर्तन, हरिनामाचा सप्ताह असे कार्यक्रम सातत्याने होत असते. यामुळे माऊलींच्या हरिनामाचा गजर गावागावांत होत असतो. मात्र याच हरिनामाला जोड लागते ती टाळ-मृदुंग , पखवाद, टाळ, याच्या नादाची. हिच गरज ओळखुन शेखर पिंगळे आणि आणि त्यांचा परिवार यांनी नावंढे गावांमध्ये दोन हरिपाठ मंडळांस भजनी साहित्य वाटप करण्यात आले. सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर साहित्य मिळाल्याने भजनी मंडळांनी आनंद व्यक्त केला आहे.
                यावेळी पिंगळे आपले मत व्यक्त करताना म्हणाले, आधुनिक जगात वावरत असताना, भौतिक प्रगती करत असताना अध्यात्माची साथ असायला हवी. अध्यात्मातून भौतिक प्रगती साधली. तर ती प्रगती निरंतर राहते. अध्यात्मिक विकास साधण्यासाठी भजन हे प्रभावी माध्यमात आहे. भजनातून आत्म्याचा परमात्म्याशी संवाद होतो. म्हणून भजनी मंडळांचा विकास व्हायला हवा.या वेळी कीर्तनकार ह.भ.प. रामदास महाराज पाटील ,ह.भ.प.तानाजी महाराज कर्णुक,सामाजिक कार्यकर्त्या वर्षा पिंगळे ,रामदास हडप,अदि ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर