कोपरी येथे भरली शेतकरी वर्गांची,मूल्य साखळी विकास शाळा,भाजीपाल्यांचे मिनी किट वाटप

कोपरी येथे भरली शेतकरी वर्गांची,मूल्य साखळी विकास शाळा,भाजीपाल्यांचे मिनी किट वाटप 






पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
कोपरी - ८ डिसेंबर 


                    कोपरी येथे स्मार्ट प्रकल्पांतर्गत सुखकर्ता ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड , कोपरी येथे मूल्य साखळी विकास शेती शाळा घेण्यात आली. सदर शेती शाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रादेशिक संशोधन केंद्र कर्जत येथील डॉ.म्हसकर यांनी भाजीपाला लागवड विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच स्मार्ट प्रकल्प अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या भाजीपाला मिनी किट मधील बियाणे, वाटप करण्यात आले.
              कार्बेन्डाझिम व स्टिकी ट्रॅप विषय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.तालुका कृषी अधिकारी-  निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना शेती विषयी विविध शासकीय योजनेविषयी मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक  महाडिक  व कृषी सहाय्यक भगत हे कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केले.  
                  शेतीशाळा चे सूत्रसंचालन व नियोजन आत्मा बी.टी.एम. प्रज्ञा पाटील हिने केले.शेती शाळेत शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते भाजीपाला  किट वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान