खालापूर नगरपंचायत हद्दीतील वणवे निंबोडे तसेच आदिवासी वाडीतील विजेची समस्या तात्काळ सोडवण्यासाठी खालापूर महावितरण अधिकारी यांना निवेदन
पाताळगंगा न्यूज : प्रसाद अटक
खालापूर : ८ डीसेंबर
खालापूर नगरपंचायत हद्दीतील वणवे,निंबोडे,दांडवाडी आणि वणवे वाडी येथे वारंवार विजेचा प्रवाह कमी जास्त होत असल्याने नागरीकांना नाहक त्रास करावा लागत आहे.सामाजिक कार्यकर्ते हरेश मोडवे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत खालापूर महावितरण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
विद्युत प्रवाह कमी जास्त होत असल्याने घरातील उपकरण तसेच पाण्याचे पंप देखील सुरू होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले.विजेची समस्या तात्काळ सोडवत स्वतंत्र नवीन विद्युत डीपी बसवण्यात यावी या मागणी साठी खालापूर महावितरण अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते हरेश मोडवे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत खालापूर महावितरण अधिकारी यांना निवेदन दिले.
तात्काळ उपाययोजना केली गेली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.या प्रसंगी ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
0 Comments