वीज कर्मचान्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने विधानसभेच्या नागपूर अधिवेशनावर भव्य मोर्चा ११ डिसेंबर रोजी निघणार भव्य मोर्चा ......
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : ८ डिसेंबर
महावितरण,महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये जवळपास ३८५०० पदे रिक्त असून या रिक्त पदांची टक्केवारी एकूण मंजूर कर्मचारी संख्येच्या ३५ टक्के आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वीज कंपन्यांची स्थापित क्षमता तसेच वीज ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊनही त्या प्रमाणात कर्मचा-यांची भर्ती केली जात नाही. तिन्ही वीज कंपन्यांमध्ये आज जवळपास ४२ हजार कंत्राटी कामगार कार्यरत असताना त्यांना स्थायी सेवेत सामावून न घेता त्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. तेव्हा तिन्ही वीज कंपन्यांमधिल संपूर्ण रिक्त पदे मागासवर्गीयांच्या अनुशेषासह भरण्यात यावी या प्रमुख मागणीसह वीज कर्मचाऱ्यांच्या इतर धोरणात्मक प्रलंबित मागण्यांच्या सोडवणूकीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे ११ डिसेंबर २०२३ रोजी विद्युत भवन, काटोल रोड, नागपूर येथून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महावितरण कंपनीमधिल तंत्रज्ञ श्रेणीतील कर्मचा-यांचे कामाचे तास निश्चित करून त्यांना वेतनश्रेणी- ३ मध्ये सामावून घ्यावे व त्यांच्या वाहन भत्त्यात वाढ करावी, यंत्रचालक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये न्याय द्यावा, मागासवर्गीय पदविकाधारक अभियंत्यांवर पदोन्नतीमध्ये सातत्याने होणारा अन्याय दूर करावा, गट विमा योजनेचा लाभ वीज कंपन्यांनी स्वतःच्या महसुलातून द्यावा, वीज कर्मचाऱ्यांना शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करावी, अभियांत्रिकी पदवी व पदविका प्राप्त कर्मचाऱ्यांना सहाय्यक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता पदावर सामावून घ्यावे,
मृत कर्मचारी वारसांना कंत्राटी पद्धतीऐवजी स्थायी स्वरूपात नियुक्ती द्यावी, तंत्रज्ञ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भर्ती कंत्राटी पद्धतीने न करता स्थायी स्वरूपात करण्यात यावी, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या तंत्रज्ञ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरतीमध्ये प्राधान्यक्रमाणे सामावून घ्यावे इत्यादी प्रमुख मागण्यांसह इतरही प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय घोडके यांनी दिली आहे.
या मोर्चात तिन्ही वीज कंपन्यांमधिल जवळपास १० हजार वीज कर्मचारी तसेच कंत्राटी कामगार सहभागी होणार असून मोर्चाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सादर करण्यात येणार असल्याचीही माहिती केंदीय अध्यक्ष मा.डॉ. संजय घोडके यांनी दिली आहे. कर्मचारी व सभासदांनानी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय कार्याध्यक्ष संजय मोरे साहेब ,केंदीय राज्य उपाध्यक्ष शैलेश आडे,विजय सिरसाळे, रमेश अहिरे,गणेश वाघ,सुहास कुंभार सुनील मस्के, लोळपोड, प्रकाश साळवी यांचे सर्व सभासदांना मार्गदर्शन लाभले प्रसार व प्रचार करून सर्वांना जागृत केले.मोर्चाला रायगड जिल्हातून व भांडुप परिमंडळातून १००च्या वर कर्मचारी सभासद उपस्थित राहणार आहे.
अशी माहिती संजय जाधव अध्यक्ष रायगड जिल्हा,विलास खताळ सचिव रायगड जिल्हा यांनी दिली आहे
0 Comments