शेतकरी बांधवाचे साखळी उपोषणाचा पाचवा दिवस!

 शेतकरी बांधवाचे साखळी उपोषणाचा पाचवा दिवस! 

  लोकप्रतिनिधी भेटीला न आल्यान शेतकरयांमध्ये तीव्र नाराजी! 



पाताळगंगा न्यूज : कृष्णा भोसले. 
तळा : २८ डिसेंबर,

              तळा तालुक्यातील शेतकरी बांधवाना आंबा पिक विमा भरपाई न मिळाल्याने शेतकरी बांधवानी शेवटी साखळी उपोषणाणांचे हत्यार उपसले, पाच दिवस झाले असून आजपर्यंत कुणीही या भागातील लोकप्रतिनिधींनी या साखळी उपोषणकर्ते शेतकरी बांधवाची भेट घेतली नाही.यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवानी तिव्र नाराजी व्यक्त केली.जगाचा पोशींद्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही ही मोठी शोकांतिका असल्यांचे शेतकरी वर्गांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
                  या तालुक्यातील शेतकरी बांधवानी आंबा काजु फळपीक विम्याचे पैसे भारतीय कृषी विमा कंपनी कडे २०२२- २०२३  मध्ये आंबा हेक्टरी २९४०० रुपये भरले परंतु नुकसान होऊनही आजतागायत शेतकरी बांधवाना पिक विम्याचे अल्प शेतकरी बांधवाना ५६०  रुपये प्रति झाड रक्कम मिळाली. तर मेढा मंडळ नसताना तिथे तिथे ९१०  रुपये प्रति झाड जाहीर झाले. जी नवीन मंडळे या मेढा मधुन तयार केली परंतु तिथे हवामान आधारित यंत्र नाही. मग अशा नवीन सोनसडे, मादांड मंडळातील शेतकरी बांधवाना पैसे कसे द्यावेत असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहीले गेले. 
           आता शेतकरी बांधवानी पेटुन उठत साखळी उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे.जोपर्यंत ९१०  प्रमाणे दर मिळत नाही.तोपर्यंत हे उपोषण सुरुच रहाणार असा निर्धार केला आहे.याकडे ही जाऊन दुर्लक्ष केल्यास या उषोषणाची दिशा बदलून आमरण उपोषण करण्याचा निर्धार शेतकरी बांधवांनी केला आहे. या उपोषणाला तालुक्यातील शेतकरी नेते माजी सभापती चंद्रकांत राऊत, कैलास पायगुडे, संजय रिकामे,रश्मीकांत वेतकर, महम्मद परदेशी, यासारखे कार्यकर्ते कायम या साखळी उपोषणात सहभागी आहेत. 
            तालुक्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी दररोज या साखळी उपोषणाला स्वत हजर राहून सहभागी होवून मनोबळ वाढवित आहे. त्याच बरोबर महीलांचाही मोठा पाठिंबा यामध्ये दिसत आहे.तर वयोवृद्ध,जेष्ठ महीला व जेष्ठ शेतकरी सुद्धा दिवसभर साखळी उपोषणाला बसलेले आहेत.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर