तळा तालुक्यातील शेतकरी बांधवाचे उपोषणाला अखेर यश!
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार शेतकरी बांधवाना फळपीक विम्याचे पैसे ३ जानेवारी पर्यत व्याजासह जमा करण्याचे आदेश!
पाताळगंगा न्यूज : कृष्णा भोसले
तळा : २८ डिसेंबर,
तळा तालुक्यातील शेतकरी बांधवाना फळपीक विम्याचे पैसे न मिळाल्याने २० डिसेंबर पासून शेतकरी बांधवानी तळा तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते.मंत्रालयात मा. कृषी मंत्री धनंजय मुंडे, खा. सुनील तटकरे, महीला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, विधानपरिषदेचे आ.अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रविण गेडाम, जिल्हा कृषी अधिक्षक, विमा कंपनी महाराष्ट्र प्रतिनिधी, व उपोषण कर्ते शेतकरी प्रतिनिधी कैलास पायगुडे, माजी सभापती चंद्रकांत राऊत, नामदेव साळवी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा घडवून जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना 3 जानेवारी २०२४ पर्यंत फळपीक विम्याचे पैसे शेतकरयांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी दिले आहेत.
या पाश्वभुमीवर मंत्री अदिती तटकरे, यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. खा. सुनील तटकरे यांचा दुरध्वनी वरून फोन, जिल्हा कृषी अधिक्षका श्रीमती बाणखेले मॅडम, कृषी आयुक्त पुणे, प्रातांधिकारी माणगाव, तहसीलदार - स्वाती पाटील, या सर्वांचे फोन, अनेकांची पत्रे, येऊनही शेतकरी बांधवांच्या हक्काचे विम्याचे पैसे खात्यात जमा होत नाही,तो पर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही या भुमिकेत ठाम राहिले. त्याचबरोबर शासनाने नविन मंडळे निर्माण करुन अधिकच्या तांत्रिक अडचणी निर्माण होऊन शेतकरी या लाभापासून वंचित राहिला त्यामुळे शेतकरी बांधवाना नाइलाजाने उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला.रायगड जिल्ह्यातील फळपीकविमा परतावा रक्कम ही शिल्लक राहिलेल्या सर्व शेतकरी बांधवाना मिळणार आहे.
तळा तालुक्यातील शेतकरी बांधवानी केलेल्या या उपोषणाचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाना होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी फळपीक विमा हप्ता हा कोकणात सगळ्या जिल्यातील शेतकरी बांधवाना यापुढे सारखा असावा असाही आदेश देण्यात आला आहे.या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३९२४ शेतकरी बांधवाचे फळपीक विम्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत असून कृषी मंत्री धनंजय मुंडे, खा. सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांचे शेतकरी बांधवांनी आभार व्यक्त केले जात आहेत.
0 Comments