चौक ग्रामीण रुग्णालय येथे कर्करोग तपासणी शिबिर, ८० रुग्णांची तपासणी,टाटा मेमोरियल सेंटर,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने

 चौक ग्रामीण रुग्णालय येथे कर्करोग तपासणी शिबिर, ८० रुग्णांची तपासणी,टाटा मेमोरियल सेंटर,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा  
चौक  : १३  डिसेंबर,
       

            ग्रामीण रुग्णालय चौक येथे टाटा मेमोरियल सेंटर मुंबई,कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली यांच्या संयुक्त विद्यामाने,कर्करोग निदान शिबिरा आयोजित करण्यात आले.यामध्ये तोंडाचा कर्करोग,स्तनाचा कर्करोग,गर्भाशय मुखाचा कर्करोग यांची लक्षणे, चिन्ह कर्करोग पूर्व तपासण्या व निदान तपासणी करण्यात आली.यावेळी  २५० पैकी  ८० रुग्णांची तपासणी करण्यात आली.दिवसेंदिवस विविध आजार निर्माण होत असतांना कर्करोग हा आजार होण्या आधी तपासणी आणी निदान करणे अतिषय महत्वाचे आहे.         
                 

            यावेळी ओपीडी मध्ये महिला वर्गासमवेत पुरुषांची तपासणी करण्यात आली.बुधवार गरोदर महिला तपासणी दिवस असल्यामुळे गरोदर महिलांना समुपदेश अशोक लोंढे यांनी या एच.आय.व्ही, एड्स मधील फरक तपासण्या लसीकरण स्तनपान याविषयी मार्गदर्शन केले.तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता कालेल यांनी उपस्थित महिलांना पोषक आहारात गरोदरपणा घ्यावयाची काळजी या विषया मार्गदर्शन केले.त्याच बरोबर नीता गावडे यांनी महिला वर्गांस मोलाचे मार्गदर्शन केले.

                 एक वर्षापासून ग्रेसफुल अँड संस्थेमार्फत गरोदर महिलांना लाडू, शेंगदाण्याची चिकी, खजूर,सफरचंद असा पोषक आहार देण्यात येत असल्यामुळे वाटप करण्यात आला.या कार्यक्रमास चौक येथिल सरपंच - रितू ठोंबरे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.सविता कालेल, डॉ.राजन यादव,डॉ.स्नेहा मॅडम डॉ.नुतन  भाटकर,डॉ. सुप्रिया डॉ.अर्चना,डॉ.जानवी डॉ.राम शेट्टी शिंदे, सिस्टर - विद्या पवार  हॉस्पिटलचे से सर्व अधिकारी कर्मचारी,उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण