माधवबाग आयुर्वेदीक रूग्णालयाचा पुढाकार - आरोग्य तपासणी शिबीराला पत्रकारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, खालापूर प्रेस क्लबचा स्तुत्य उपक्रम
पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले
खालापूर : १४ डिसेंबर,
पत्रकार दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी तसेच अन्याय विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात.मात्र बातमी कव्हर करीत असतांना शरिराला जपणे ही महत्वाचे असते.पत्रकार हे समाज्यासाठी झटत असल्यामुळे त्यांच्यावर शरिर उत्तम रहावे यासाठी माधवबाग आयुर्वेदीक रूग्णालयाच्या आरोग्यम हृदयसंपदा उपक्रमा अंतर्गत खालापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर १३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.यावेळी कर्जत,माथेरान,खोपोली सह खालापूर पत्रकार उपस्थित राहून,आरोग्य तपासणी करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांची वैद्यकीय तपासणी करण्याचे जाहीर केल्यानंतर पत्रकारांची वैद्यकीय तपासणी शिबीर खालापूर प्रेस क्लब आयोजित करण्यात आले.यावेळी माधवबाग आयुर्वेदीक रूग्णालय यांच्या सहकार्याने वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी येथील डॉ. राहुल जाधव, जनसंपर्क अधिकारी रोझी भानुशाली यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी माधवबाग हॉस्पिटल कॉरपरेट मार्केटिंगच्या स्नेहल जाधव, कॉरपरेट मार्केटिंगच्या सी.ओ.रोजी भानुशाली, इनचार्ज अरुण यादव यांच्यासह अन्य माधवबाग टीमने पत्रकार बंधूची शिबिरासाठी मेहनत घेतली.
यावेळी प्रेस क्लबचे सल्लागार भाई ओव्हाळ, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, संवादचे मुख्य संपादक बाबू पोटे, पत्रकार संदीप ओव्हाळ, समाधान दिसले, संतोषी म्हात्रे, अरुण नलावडे, अर्जुन कदम, सारिका सावंत, काशिनाथ जाधव, राज साळुंखे, कर्जतचे पत्रकार विजय मांडे, संजय मोहिते, दिपक पाटील, विलास श्रीखंडे,अजय गायकवाड, राहुल देशमुख, गणेश पवार, देशमुख, अनिल गवळे, ज्ञानेश्वर बागडे, गणेश पुरवंत, मोतीराम पादीर, माथेरानचे मुकूंद रांजणे, दिनेश सुतार आदि पत्रकार आरोग्य तपासणी शिबीरात उपस्थित होते. तर धावपळीच्या जिवनात माधवबाग आयुर्वैदिक रूग्णालयाने पत्रकारांची आरोग्य तपासणी केल्याबद्दल व्यवस्थापकांचे आभार व्यक्त केले आहे.
0 Comments