वारकरी महामंडळ युवा संघटनेच्या कार्याध्यक्षपदी हभप योगेश महाराज कदम यांची निवड

 वारकरी महामंडळ युवा संघटनेच्या कार्याध्यक्षपदी हभप योगेश महाराज कदम यांची निवड





पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : १३ डिसेंबर,

                कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी येथे वारकरी महामंडळ युवा संघटना महाराष्ट्र राज्याचा मेळावा संपन्न झाला.यामध्ये रायगड जिल्हा कार्याध्यक्ष पदी हभप.योगेश महाराज कदम तर अध्यक्षपदी हभप.दिनेश महाराज महाडीक यांची निवड करण्यात आली.यावेळी खालापुर तालुका अध्यक्षपदी हभप.हनुमंत महाराज लभडे,उपाध्यक्ष हभप. विश्वनाथ महाराज मुंढे, सचिव हभप.दर्शन महाराज शेंडे यांची नियुत्ती करण्यात आली.
                  वारकरी महामंडळ युवा संघटनेची स्थापना आजचा युवा शारिरीक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावा, तसेच सुसंस्कारी, सदाचारी, व्यसनमुक्त व्हावा, युवकांमध्ये संत साहित्याची ओळख, जागृती व आवड निर्माण व्हावी. यासाठी तसेच अध्यात्मिक ज्ञान आणि भारतीय संस्कृतीचे ज्ञान हे प्रत्येक तरुणांमध्ये प्रचार-प्रसार समाज तसेच प्रबोधनाच्या माध्यमातून करुन, गावोगावी युवकांचे संघटन वाढावे,समाजामधील हिताच्या गोष्टींसाठी संघर्ष करण्याची मनोवृत्ती वाढावी.
               समाजामध्ये प्रत्येक व्यक्तिला सुख, आनंद, समाधान आणि शांतता प्राप्त व्हावा तसेच समाजामध्ये एकमेकांविषयी आपुलकी, प्रेम, बंधु-भाव प्रेरित करुन समृद्ध युवक, बलशाली भारत निर्माण व्हावा यासाठी प्रत्येक युवक देशभक्तीने प्रेरित होऊन समाजकार्य करेल असा आदर्श युवक तयार व्हावा या साठी संघटना काम करीत आहे.या संघटनेच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी खालापूर तालुक्यातील हभप.योगेश महाराज कदम यांची निवड झाल्याने त्यांचे खालापूर तालुक्यातील वारकरी परिवाराकडून विशेष अभिनंदन केले जात आहे.
 
         कोट 
बसमध्ये शेवटच्या सिटवर बसून प्रवास केलात तर खूपच धक्के खावे लागतात. म्हणजे प्रवासात चालकापासून आपण जितके दूर तितके धक्के जास्त,तसेच या जीवनाच्या प्रवासात देखील विश्वाचा चालक परमात्मा परमेश्वर आहे,त्याच्या पासून आपण जितके दूर तितके धक्के जास्त.म्हणून शक्य होईल तितकी जवळीक साधा.भजन,पूजन,नामस्मरण, ध्यान यापैकी कोणतीही सीट पकडा तुमच्या जीवनाचा प्रवास सुखकर होईल.माझ्यावर ज्या विश्वासाने वारकरी महामंडळ युवा संघटनेच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे ती तितक्याच क्षमतेने पेलण्याची ताकद परमेश्वराने द्यावी.
___ हभप.योगेश महाराज कदम
कार्याध्यक्ष, वारकरी महामंडळ युवा संघटना

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात