२४० महिलांना प्रशिक्षण देऊन दिले प्रमाणपत्र

ऑलकार्गो समूहाकडून  गरजू आणि वंचित  महिलांना शिलाईचे  प्रशिक्षण,

२४०  महिलांना प्रशिक्षण देऊन  दिले प्रमाणपत्र,
गरजू महिलांना  सक्षमीकरणासाठी दिला आर्थिक   मदतीचा हात ....



पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : १८ डिसेंबर,

                'आवाश्य फाउंडेशन'ने, महाराष्ट्रातील वंचित समुदायांच्या विकासाचे उद्दिष्ट ठेऊन, उपेक्षित आणि वंचित महिलांची प्रगती व सक्षमीकरणासाठी तीन महिन्यांचे शिलाई  प्रशिक्षण देण्यात आले.लॉजिस्टिक समूह असणाऱ्या ऑलकार्गोकडून आवाश्य फाउंडेशनव्दारे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतांना 'आवाश्य फाउंडेशन' विविध ठिकाणी या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करत आहे,यावेळी प्रशिक्षण पुर्ण झालेल्या २४० महिलांना प्रमाणपत्र,व गरजू महिलांना सक्षमीकरणासाठी आर्थिक   मदतीचा हात देण्यात आला.

             महिला वर्गांचे हे प्रशिक्षण पुर्ण झाले असून इतर ठिकाणीही त्याचे नियोजन करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यातील धामणी आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये आणि नवी मुंबईतील दिघा, ईश्वर नगर येथे हे प्रशिक्षण झाले असून . हा उपक्रम महाराष्ट्रातील वंचित समुदायांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या संकल्प मानव विकास संस्थेच्या सहकार्याने वस्त्रोद्योग आधारित उद्योजकतेला चालना देण्यासाठी असल्याचा  ऑलकार्गोच्या सीएसआर उपक्रमाचे प्रमुख डॉ. निलरतन शेंडे यांनी सांगितले. 

               नुकतेच प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या २४० महिला लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली असून,या उक्रमात आतापर्यंत विविध ठिकाणी ४१० पेक्षा जास्त महिलांना त्यांचा लाभ झाला आहे. मार्च २०२४ पर्यंत या प्रकल्पांतर्गत आणखी ४०० महिलांना प्रशिक्षण देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून कुटूंबाला हातभार लागणार असल्याने  महिलांनी  या संस्थेचे आभार मानले आहे

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण