रिल्स स्टार' स्पर्धेत खोपोलीची कन्या शिवन्या बोराडे चमकली - चौथ्या क्रमांकाची ठरली मानकर
पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले
खालापूर : १८ डिसेंबर,
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अनिकेत घुले मित्र परिवाराच्या वतीने रिल्स स्टार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभाग दर्शवत आपली कला सादर केली असता या स्पर्धेत चांगलीच रंगत चढली होती. तर या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रिल्स बनवत प्रशिक्षकांबरोबर आयोजनांवर भुरळ पाडले असता या स्पर्धेत खोपोलीतील २ वर्षाची असलेली कन्या शिवन्या बोराडे हिने छाप पडत चौथा क्रमांक पटकावला, त्यामुळे शिवन्या बोराडेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
तर रिल्स स्टार' स्पर्धेत खोपोलीची कन्या शिवन्या बोराडे चमकल्याने तिला आयोजक अनिकेत घुले यांच्या वतीने सन्मानचिन्ह - प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले आहे.या स्पर्धेत सुमन नलावडे व अमीन खान यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सोशल मीडियातील विविध माध्यमातून अनेक जण प्रकाश झोतात येत आहेत, तर अशाच कलाकारांना प्रकाश जोरात आणण्यासाठी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पै.अनिकेत भाऊ घुले यांनी रील स्टार स्पर्धेचे आयोजन केले होते, या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील हजारो स्पर्धकांनी सहभाग दर्शवत आपली कला सादर केली असता या स्पर्धेत खोपोलीच्या कन्येने उत्कृष्ट कला सादर करत लाखो जणांच्या मनावर भर पडल्याने या स्पर्धेत खोपोलीतील शिवन्या बोराडे हिने चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावत रील स्टार स्पर्धेत चमकली आहे.
तर शिवन्या बोराडे हिला इंस्टाग्राम वर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून इंस्टाग्राम वर ४५ हजाराच्या वरती फॉलोवर्स आहेत, तिची इंस्टाग्राम वर व्हिडिओ पडताच काही क्षणातच हजारो तिचे चाहते व्हिडिओ पहात तिला प्रोत्साहित करता आहे, त्यामुळे इंस्टाग्राम च्या माध्यमातून खोपोलीची कन्या चांगलीच प्रकाश झोतात आली आहे.
0 Comments