काँग्रेस खासदार धीरज शाहू यांच्या बेनामी संपत्ती विरोधात खोपोली येथे भाजपा तर्फे आंदोलन..
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : ११ डिसेंबर ,
काँग्रेसचे खासदार धीरज शाहू यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती सापडली असून त्याबाबत अद्याप मोजमाप सुरू आहे भारतीय जनता पक्षाने आज सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उग्र निदर्शने केली त्याप्रमाणे धीरज साहू यांच्या फोटोस चप्पल मारो आंदोलन केले. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनीताई पाटील, महिला मोर्चा शहर अध्यक्षा शोभा काटे व शहराध्यक्ष रमेश रेत्रेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पाटील यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. अशा भ्रष्टाचार मार्गाने कमवलेल्या संपत्तीची केंद्र शासनाने सखोल चौकशी करावी व चौकशी त आरोप सिद्ध झाल्यास त्यांना कडक शासन करावे अशी मागणी केली.अशे अनेक भ्रष्टाचारचे प्रकरणं लवकरच बाहेर येतील आणि किती मोठ्या प्रमाणात इतके वर्ष भ्रष्टाचार केला आहे हे जनतेस समजेल असे शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर यांनी सांगितलं.
या निषेध आंदोलनासाठी भाजप शहर सरचिटणीस राहुल जाधव, उपाध्यक्ष विकास खुरपडे, चिटणीस सुनील नांदे, अस्मि सावरेकर, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस अश्विनी अत्रे, जिल्हा सदस्या सुनीता पाटणकर, कर्जत विधान सभा विस्तारख हेमंत नांदे, वैद्यकीय कोकण विभाग उपाध्यक्ष डॉ. बबन नागरगोजे, कामगार आघाडी संयोजक अनिल कर्णुक, शक्ती केंद्र प्रमुख संजय म्हात्रे, हेमंत भाटिया, सागर काटे, शहर महिला मोर्चा सरचिटणीस सुप्रिया नांदे, उपाध्यक्षा सीमा मोगरे, विमल गुप्ते, कोषअध्यक्षा विभा पाठक, महिला मोर्चा अल्पसंख्यकच्या नगीना पठाण, सदस्या माया कांबळे, रसिका शेट्टे, स्नेहल सावंत, साक्षी पवार आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments