रस्त्यावर पडलेला खड्डा भरुन,वाहान चालकांस दिलासा, विशाल म्हामुणकर यांचा पुढाकार
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
कुंभीवली : ११ डिसेंबर
सावरोली खारपाडा या डांबरीकरण उत्तम प्रकारे असून मात्र एखाद्या ठिकाणी रस्त्यावर खड्डा पडला की ते तातडीने भरले जात नसल्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत असते.शिवाय हा रस्ता उत्तम प्रकारे असल्यामुळे वहान चालक वेगाने वहान चालवित असतात.परिणामी रस्त्यावर पडलेला खड्डा निदर्शनास न आल्यामुळे अपघात घडत असतात.मात्र वहान चालकांस अपघात घडू नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना वडगाव जिल्हा परिषद विभाग अधिकारी विशाल अशोक म्हामुणकर यांनी पुढाकार घेवून कुंभीवली पेलाडीन कंपनी समोरहे पडलेले खड्डे भरण्यात आल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.
तालुक्यातील असलेल्या रस्त्याची दुरवस्था आहेच मात्र ग्रामीण भागातील गावांना जोडणा-या रस्त्यांची अक्षरशा चालन झाली आहे.रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशिच स्थिती निर्माण असून या कडे मात्र लोक प्रतिनिधी या कडे दुर्लक्ष करीत आहे.परिणामी खड्यातून प्रवास करावा लागत असल्यामुळे अनेकांना शरिरिक व्याधी निर्माण होत असून यामध्ये शाळकरी मुले,वयोवृद्ध अश्या अनेकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
मात्र सावरोली - खारपाडा या मार्गावर गेले अनेक दिवस खड्डे हे कुंभीवली येथिल पेलाडीन कंपनी समोर पडले मात्र संबधित अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे,कुणाचाही या खड्यामुळे जिव गमवावा लागू नये,यासाठी समाजसेवक विशाल म्हामुणकर यांनी ह्या पडलेल्या खड्यामध्ये कॉंक्रिट टाकून पडलेले खड्डे भरले असल्यामुळे आता या ठिकाणी कुणालाही अपघात होणार नाही,या ठिकाणी पडलेल्या खड्यामुळे वहाण घसरण्यांचे प्रमाण वाढले होते.या ठिकाणी रिक्षा पलटी सुद्धा झाली असल्यामुळे असे अपघात सातत्याने घडत असल्यामुळे एक पाउल पुढे टाकून वाहान चालकांस दिलासा दिला आहे
0 Comments