असरोटी इंग्लिश स्कूल येथे विविध स्पर्धेत उत्तम गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

 असरोटी इंग्लिश स्कूल येथे  विविध स्पर्धेत उत्तम गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित  





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
आसरोटी : २७ डीसेंबर,

             
              दर वर्षी टी.एन.एम.पब्लिक स्कुल असरोटी येथे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते.या क्रिडा क्षेत्राबरोबर अन्य उपक्रम राबविण्यात आले.यावेळी कब्बडी,खोखो,उंचउडी ,थाळी फेक,गोला फेक,शंभर -चारशे  मिटर धावणे,संगित खुर्ची,तसेच चित्रकला,रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले.यावेळी विद्यार्थी ने  मोठ्या उत्साहाने सहभाग घेवून आपली कला सादर करण्यात आली होती.यावेळे विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह,सन्मान पत्र,मेडल देवून गौरविण्यात आले.यावेळी या कार्यक्रमास त्यांचे पालक वर्ग उपस्थित होते.                                         




   विद्यार्थ्यांना शिक्षणासमवेत खेळण्यांचे कौशल्य असणे महत्वाचे आहे.त्यांच्या मध्ये असलेल्या असलेली कला त्यांना सादर करता यावी यासाठी हे उपक्रम राबविण्यात येत असल्यांचे या शाळेचे अध्यक्ष संतोष मुंढे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करतांना सांगितले.चौक परिसरात आसरोटी गावाजवळ आपली आई कै.ताराबाई नारायण मुंढे,सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी टी.एन.एम इंग्रजी माध्यमाची २०१०  विद्यालयाची स्थापना करून शिक्षणाचे रोपटे लावलेले आता ४०० हून अधिक विद्यार्थी असून दहावी पर्यत वर्ग झाले आहे. शिवाय दर वर्षी या वर्गांचा निकाल १०० टक्के लागत आहे.
               


  यावेळी या कार्यक्रमास,अध्यक्ष : संतोष नारायण मुंढे ,उपाध्यक्ष : सुभाष मुंढे, सचिव - कृष्णा गोरे , अदि शाळेय कमिटी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच मान्यवर म्हणून शिवसेनेचे नेते - उत्तमशेठ भोईर,सुर्याजी पाटील,शंकर ठोंबरे,महादु मुंढे,आर. के.भोसले,तसेच मुख्याध्यापक - जयश्री म्हात्रे,संगिता मॅडम,टीना मॅडम,सायली पाटील,सोनिका दळवी,नमिता मॅडम,बेनिसा शेख,वृक्षाली दळवी,स्मिता मॅडम,सोनाली पिंगळे,अक्षदा मॅडम,पुनम मॅडम,अश्विनी मोरे,हर्शदा मॅडम,अमृता पाटील,प्रियंका मॅडम,प्राजक्ता मॅडम,धृवी मॅडम,मंजुला मॅडम,संध्या मॅडम,नेहा मॅडम,सुमन जाधव अदि शिक्षक यांनी खूप मेहनत घेतली.तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुनम मुंढे,टिना शेख हिने केले.



             

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण