मुबंई पुणे एक्सप्रेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, पाच ते सहा किमी वाहनांच्या रांगा

 मुबंई पुणे एक्सप्रेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, 

 सलग सुट्ट्यामुळे प्रचंड वाहतूक ,पाच ते सहा किमी वाहनांच्या रांगा 
  
मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास होतोय डोकेदुखी ....पर्यटक आणि वाहन चालकांना होतोय नाहक त्रास 



पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २३ डिसेंबर,

                   मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात पुणे लेन वर वाहनाच्या लांबच - लांब रांगा लागल्या असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्यांचे पहावयांस मिळाले,सलग  चार दिवस सुट्या आल्याने मुंबई कडून पर्यटक लोणावळा खंडाळा आणि पुण्याकडे निघाल्याने कोंडी मुळे नियोजित वेळेवर पोहचण्यांस खुप अडथळा निर्माण झाल्यांचे पहावयांस मिळाले, मात्र हीच कोंडी प्रवासी वर्गांची आणी वहान चालकांची डोके दुखी ठरत आहे. 
                  मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात  अमृतांजन ब्रिज पासून पाच ते सहा किमी पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर जुन्या मुबंई पुणे महामार्गावरील अंडा पॉइंड जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे, 
                 शनिवार रविवार सोमवारी ख्रिसमस, आणि मंगळवारी दत्त जयंती असल्याने शाळा आणि सरकारी कार्यालय बंद असल्याने मुबंई कडील प्रवाशी आणि पर्यटक हे पुण्याकडे जास्त प्रमाणात निघाल्याने एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे, मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील अमृतांजन ब्रिज पासून वाहनाच्या लांबच लांब रांगा असल्याने याचा नाहक त्रास वाहन चालक आणि पर्यटकांना सहन करावा लागत आहे 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण