सावरोली - खारपाडा रस्ता बनलाय पार्किंग झोन,अपघाताची शक्यता गंभीर
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
इसांबे : ११ जानेवारी,
सावरोली - खारपाडा या रस्त्यालगत अनेक कारखाने असल्यामुळे, या ठिकाणी अवजड वहानांची सातत्याने रेलचेल सुरु असते.काही कारखाने छोटे असल्यामुळे रस्त्यालगत वहाने उभी केली जातात.परिणामी वाहतुकीची कोंडी समवेत अपघाताची दाट शक्यता निर्माण होत आहे.इसांबे - लोहप नजदिक असलेले बाबा कॅन्टीनिअर,या कारखान्यासाठी लागणारा माल आणलेल्या वहानांनी कारखान्यात जागा नसल्यामुळे,रस्त्याच्या कडेला उभे केल्यामुळे या ठिकाणी वाहुकीसाठी अडथळा निर्माण होत असल्यांने प्रवासी वर्गामधून नाराजीचा सुर उमठत आहे
या कारखान्यात प्लॅस्टिक चे ड्रम बनविले जात असल्यामुळे, या साठी लागणारा कच्चा माल,उरण नावा - शिवा येथून या कारखान्याला आण्यात आले ,जवळ - जवळ ४०० मिटर अंतरावर वहानांच्या लांबच- लांब वहानांच्या रांगा लागल्यामुळे त्यातच पहाटे धुक्याचे सावट असल्यामुळे प्रवासी वर्गांना वहान चालविणे मोठे धोकादाय होत आहे.कारखाने रस्त्यालगत असल्यामुळे आपल्या मन मर्जी प्रमाणे वहाने पार्किंग केली जाते जसे या ठिकाणी पार्किंग झोन केलेला आहे.परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
या परिसरात शेकडो कारखाने असल्यामुळे दिवसभरातून हजारो वहाने या मार्गावरुन वाहतूक करीत आहे.त्याच बरोबर शाळकरी मुले,तरुण वर्ग,वयोवृद्ध असे अनेक जण प्रवास करीत आहे.परिणामी हा रस्ता अपघाताचे केंद्रबिंदू बनत आहे,या मार्गावर असे अनेक अपघात घडले आहे.मात्र कोणीही गांभीर्याने घेत नसल्यामुळे यामुळे अनेकांचा नाहक बळी जात आहे.मात्र असे असले तरी सुद्धा या अनाधिकृत पार्किंग लगाम केव्हा लागेल,असे प्रश्न या मार्गावरुन प्रवास करीत असलेल्या सर्व सामान्य प्रवासी वर्गांस पडत आहे.
0 Comments