भाजपा मोर्चाच्या कर्जत विधानसभा संयोजकपदी प्रसाद पाटील यांची निवड

 भाजपा मोर्चाच्या कर्जत विधानसभा संयोजकपदी प्रसाद पाटील यांची निवड



पाताळगंगा न्यूज :  समाधान दिसले
खालापूर : २१ जानेवारी,

           महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महड येथील भाजपचे युवानेते प्रसाद रामजी पाटील यांची कर्जत - खालापूर विधानसभा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आल्याने प्रसाद पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
              खालापूर तालुक्यातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य जनता व कामगारांसाठी झटणारे महड गावातील भाजपचे युवानेते प्रसाद रामजी पाटील यांची कर्जत - खालापूर विधानसभा संयोजक पदी भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी नियुक्ती केली असून आपल्या संघटन कौशल्याने आपल्या विभागात भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे संघटन वाढवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी घोषणा पत्रकाद्वारे घोषित करण्यात आली.
                तर प्रसाद रामजी पाटील यांची कर्जत - खालापूर विधानसभा संयोजक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रसाद पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
                तसेच या निवडीनंतर प्रसाद पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, लोकसभा व विधानसभा निवडणुकीबरोबर अन्य सर्वच निवडणुकीमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत पक्ष वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून पक्षाच्या माध्यमातून सामान्याचे प्रश्न मार्गी लावेल, असे मत नवनिर्वाचीत कर्जत - खालापूर विधानसभा संयोजक प्रसाद रामजी पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर