धनगर समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम

 धनगर समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन 

जय मल्हार धनगर समाज  सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम 



पाताळगंगा न्यूज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २३ जानेवारी,

               जय मल्हार  धनगर समाज सेवाभावी संस्था रायगड यांच्या  वतीने धनगर समाजाच्या  वार्षिक स्नेहसंमेलनाचे  आयोजन करण्यात आले असून हे स्नेहसंमेलन रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी भैरवनाथ नगर( धामणसई रोहा ) येथे आयोजित करण्यात आले आहे, 
           यावेळी सायंकाळी ५ वाजता या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करणे ,मान्यवरांचे स्वागत करणे, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे, प्रमुख पाहुण्यांचे मनोगत, समाजाच्या समस्यांवर चर्चा करणे, सार्वजनिक फंडाची वसुली करणे,  आणि दुपारी  १२ ते ५ या वेळेत समाजाच्या कब्बडीचे सामने होणार आहेत तरी स्नेहसंमेलनाला धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय मल्हार धनगर समाज  सेवाभावी   संस्था  रायगडचे जिल्हाध्यक्ष मधुकर ढेबे, आणि  सचिव राजू आखाडे यांनी केले आहे,

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर