आत्करगावच्या विद्यार्थ्यांनी कबड्डीमध्ये पटकाविला प्रथम क्रमांक,तर मुलींनी लंगडी मध्ये मिळवला पहिला क्रमांक
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : २३ जानेवारी,
रायगड जिल्हा परिषद शाळा आत्करगाव येथील विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत तर मुलींनी लंगडी मध्ये मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे,आत्करगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा.परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सारसन शाळेत क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या यावेळी आत्करगाव जिल्हापरिषद आणि कातकरवाडी येथील शाळा अश्या दोन्ही मिळून एका संघाने सहभाग घेतला होता,
यात रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा आत्करगाव येथील मुलांनी कबड्डी स्पर्धेत पहिला क्रमांक पटवकिवा तर आत्करगाव व आत्करगाव कातकरवाडी येथील मुलींनी लंगडी मध्ये पहिला क्रमांक मिळवला. या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक मच्छिंद्र खेमनर, उपशिक्षक रमेश चारवाडीकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले , मुलां मुलींनी पटकविलेल्या यशामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
0 Comments