पिल्ले एच.ओ.सी कॉलेज च्या विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम

 पिल्ले एच.ओ.सी कॉलेज च्या विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम






पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली  : २२ जानेवारी, 

                स्वच्छता जिथे आरोग्य नांदे तेथे या पंक्तीच्या माध्यमातून शेवटच्या वर्षाला असलेले बीएसी,बीकॉम, च्या विद्यार्थांनी गृप ग्राम पंचायत माजगांव या परिसरातील असलेल्या गावामध्ये सात दिवस कॅम्प बसवून तेथे स्वच्छता समवेत पथनाट्ये सादर करून येथिल ग्रामस्थांची मने जिंकली.कॉलेज चे शिक्षण घेत असतांना शालेय एक भाग म्हणून विद्यार्थी एकत्र ऐवून गावातील परिसर स्वच्छ केला.हातात झाडू घमेले,घेवून या विद्यार्थ्यांचे स्वच्छता साठी हात पुढे सरसावत होते.
                 आपला परिसर स्वच्छ ठेवा,कच-यांचे वर्गीकरण करुन तिचे विल्हे वाट लावणे हे प्रत्येकांनी विचारांत घेतले पाहिजे.तसेच स्वच्छता विषयी महत्व पटवून दिले.गावाच्या आजूबाजूच्या परिसर स्वच्छ ठेवून येणाऱ्या आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो.तसेच विविध विषयावर पथनाट्ये सादर करुन उपस्थितांची मने जिंकली या कॅप्म मध्ये विद्यार्थी समवेत विद्यार्थीनी उपस्थित होते.
                 या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कलावती उपाध्या,ग्रूप ग्राम पंचायत माजगांव मा. सरपंच गोपीनाथ जाधव,अदि या विद्यार्थ्यांना प्रात्साहन देण्यासाठी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर