जुन्या मित्राच्या आठवणी झाल्या ताज्या ,३५ वर्षांनी श्री अरणेश्वर विद्यालय अरणगांव चे विद्यार्थी एकत्र

 जुन्या मित्राच्या आठवणी झाल्या ताज्या ,३५ वर्षांनी श्री   अरणेश्वर विद्यालय अरणगांव चे विद्यार्थी एकत्र





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
जामखेड : २५ जानेवारी,
  
                शालेय जीवन म्हणजे मज्जा,मस्ती,अभ्यास करण्यांचे दिवस, मात्र आपण ज्या वेळी शाळा सोडून जातो त्यावेळी आपण या शाळेमध्ये घालवलेले क्षण आठवत असतात.पुन्हा एकदा शाळेमध्ये जावून मस्ती धमाल करण्यांची ईच्छा होते.मात्र आपण शाळेपासून खूप दूर गेलेलो असतो.मात्र तो क्षण पुन्हा निर्माण व्हावा,यासाठी सोशल मिडीयांच्या माध्यमातून,दहावीच्या १९८९ च्या बॅच असलेले श्री अरनेश्वर विद्यालय अरणगांव ता. जामखेड,अहमदनगर या विद्यार्थी एकत्र ऐऊन जुन्या आठवणींचा उजाळा दिला,यावेळी सर्वांच्या चेह-यावर हास्य झळकले होते,खूप दिवसांनी मित्र भेटल्यामुळे आनंदाला उधाण आले होते.

                       दहावी चे शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या शाळेचे अनेक मित्र एकमेकांपासून दुरावले गेले होते.मात्र आज सोशल मिडीयांच्या माध्यमातून मोबाईल द्वारे बोलणं होत असते,प्रत्येक्षात भेटणे अवघड झाले होते.यामुळे आपण सर्व मित्रांनी एकत्र ऐऊन शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गोरख पारे,डॉ. नन्ववरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अखेर ही प्रतिक्षांची भावना संपली आणी सर्व मित्र एकत्र आले. यावेळी विद्यार्थीनी  प्रत्येकांची  मैत्री ही अशीच घट्ट रहावी या साठी एकमेकांनी शुभेच्छा दिल्या.     

                  या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य 
 - वंदना डमाळे यांनी केले, प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक - शिकारे सर,अडसुळ सर,भोरे सर,यावेळी १८ शिक्षक आणी ७५ विद्यार्थी या शाळेमध्ये एकत्र आले होते.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन - कोकाटे गुरुजी व सुरेश भांडवलकर,तसेच आभार प्रदर्शन विनोद पारे, यांनी केले.यावेळी गोरख पारे यांनी नियोजन करुन सर्वांना एकत्र आणले यामुळे माजी विद्यार्थ्यांनी आभार मानले,यावेळी या गावातील ग्रामस्थ, शाळा कमिटी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर