७५ व्या प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी प्रभात रॅली

७५ व्या  प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी प्रभात रॅली 








पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली  : २६ जानेवारी ,

         ७५ व्या  प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद सेंट्रल स्कूल माजगाव येथे ध्वजारोहन मुख्याध्याक -  किरण कवाद यांच्या  हस्ते करण्यात आले.यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.त्याच बरोबर या प्रजासत्ताक दिनांचे महत्व प्रत्येकाला समजावे या विचारांतून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. विविध घोष वाक्यांनी हा परिसर गर्जुन गेला होता.सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,तसेच राजकीय अशा विविध स्तरावरील मंडळी उपस्थित या रॅलीत सहभागी झाले होते.           


                                                                                        आपला भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.आणी ख-या अर्थाने आज देशाला स्वातंत्र्य मिळाले.अनेक वर्ष पारितंत्र्यात असलेला देशाला आज सुवर्ण युग म्हणावे लागेल,यामुळे खालापुर तालुक्यातील विविध ठिकाणी हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.तसेच नृत्य,देशभक्ती गीत  सादर करून उपस्थितांची मने जिंकली.                                                                           

     यावेळी गृप ग्राम पंचायत माजगांव सरपंच दिपाली पाटील,उप सरपंच राजेश पाटील,ग्रामसेवक - संदिप धारणे,सदस्य पुनम जाधव,प्रांजळ जाधव,वैशाली महाब्दि,अपर्णा शिंदे,सरिता वाघे,कृषी उत्पन्न बाजार समिती उप सभापती - जयवंत पाटील,आर.पी.आय रायगड उपाध्यक्ष -अविनाश कांबळे,शिक्षक मुख्याध्याक - किरण कवाद- भूषण पिंगळे व रेखा जाधव ,मंगेश पाटील,यशवंत शिंदे,नितिन महाब्दि,विनायक गायकवाड,रणधीर पाटील,निलेश ढवालकर,गौतम कांबळे,रमेश ढवालकर,चंद्रकांत जाधव,अदि उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण