प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केली वेशभूषा,कुलदैवत यांचे जेजुरीला अभिषेक

 प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केली वेशभूषा,कुलदैवत यांचे जेजुरीला अभिषेक 





    
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली : २३  जानेवारी,

                तिर्थक्षेत्र प्रभू श्री रामाची जन्मभुमी आयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळा या ऐतिहासिक आणी पवित्र क्षणांचे औचित्य साधून आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये हा आजचा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले.त्याच बरोबर आंबिवली येथिल ग्रामस्थांचे कुलदैवत अभिषेक साठी जेजुरीला, नेण्यात आले.या ठिकाणी जावून अभिषेक करण्यात आले.तसेच सायंकाळी वाजत - गाजत देव्हा-यात ठेवण्यात आले.
 कुलदैवताचा अभिषेक आणी प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापणाच्या  हे दोन्ही कार्यक्रम करण्यात आले.सायंकाळी  पिल्ले एच.ओ.सी.कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी रामायण हे पात्र साकारण्यात आले, यावेळी सीता, विवाह सोहळा,लंकादहन,रावण वध,असे वेषभूषा साकारण्यात आली.

                  त्याच बरोबर सायंकाळी आयोध्या येथुन आलेल्या अक्षदा यांचे पुजन करुन दिवे लावण्यात होते.विषेष म्हणजे गावातील असलेल्या रस्त्याच्या बाजूला सुद्धा दिवे लावल्यामुळे प्रत्येक गाव हा लख्य प्रकाशाने उजळून निघाले होते,फटाक्याच्या अतिष बाजीत आणी ढोल ताश्याच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली,यावेळी लहाना पासून थोरापर्यंत या मध्ये सहभागी झाल्यांचे पहावयास मिळाले आपण आयोध्या या ठिकाणी पोहचू शकलो नाही,मात्र तो कार्यक्रम गावामध्ये घेवून आनंद व्यक्त करीत साजरा करण्यात आला.


                    आजचा दिवस संपुर्ण या विश्वासाठी अत्यंत पवित्र असून आज या राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापणा आयोध्या येथे करण्यात आल्यामुळे, सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले,पहावयांस मिळाले,हातामध्ये श्रीरामचा ध्वज घेवून वाजत- गाजत मिरवणूक निघालेली पहावयांस मिळाली.सकाळी जेजुरी येथे अन्न दान राजेश जाधव उद्योजक यांच्या माध्यमातून देण्यात आले तसेच सायंकाळी अरुण जाधव,व निलेश जाधव यांच्या कडून देण्यात आले,तसेच बॅंड मा. सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या माध्यमातून देण्यात आले.

                यावेळी या कार्यक्रमात गृप ग्राम पंचायत माजगांव मा.सरपंच गोपीनाथ जाधव,रुपेश जाधव,रमेश जाधव,प्रकाश जाधव,जनार्धन जाधव,मंगेश पाटील,आत्माराम जाधव,प्रदिप जाधव,रमाकांत जाधव,अशोक जाधव,अरुण जाधव,भरत पाटील,मोतीराम जाधव,ह.भ.प. रमेश पाटील,संदेश जाधव,निलेश जाधव,सुरेश जाधव,किशोर जाधव,चंद्रकांत जाधव,प्रभाकर जाधव,अदि उपस्थित होते.


 




 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर