माणकीवली ग्रामपंचायत नवीन कार्यालयाचे उघ्दाटन आ.थोरवेंच्या हस्ते संपन्न

 नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वास्तूमधून पारदर्शी कारभार करा - आ.महेंद्र थोरवे

माणकीवली ग्रामपंचायत नवीन कार्यालयाचे उघ्दाटन आ.थोरवेंच्या हस्ते संपन्न




पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले 
खालापूर : २७ जानेवारी,

             कर्जत - खालापूर विधानसभा मतदारसंघाचे नंदनवन करण्याचा घेतलेला ध्यास आमदार महेंद्र थोरवेंंनी घेतल्याने असंख्य प्रलंबित विकास कामे मार्गी लावली असून असंख्य विकास कामे प्रगतीपथावर असल्याने आमदार महेंद्र थोरवेंच्या कामगिरीचे कौतुक होत असताना 25 जानेवारी रोजी खालापूर तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायत नवीन कार्यालयाचे उघ्दाटन आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते पार पडल्याने ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून यावेळी आमदार महेंद्र थोरवेंंनी आपले मत मांडताना म्हणाले की, नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वास्तूमधून पारदर्शी कारभार करा, तर मी आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी पुढेही निधी कमी पडू देणार नाही, असे मत आ.थोरवेनीं मांडले.

                  याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, युवासेना तालुका आधिकारी रोहित विचारे, माजी प स.सदस्य उत्तम प्रबलकर, प्रवक्ते सुरेश देशमुख, मा.नगरसेवक अमोल जाधव, मा.नगरसेवक राजू गायकवाड, शिव सहकार सेनेचे हरेश काळे, शिवसेनेचे राजू खांडेकर, मा.सरपंच विजय देशमुख, मा.उपसरपंच विकास रसाळ, अशोक पिंगळे, विजय देशमुख, रवींद्र देशमुख, सुर्यकांत पाटील, शशिकांत देशमुख, मंगेश देशमुख, वामन देशमुख, शशिकांत विचारे, शिंदे गट शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख नीलम चोरगे, रेशमा आंग्रे, मा.सरपंच योगिता भारती, अर्चना पाटील, विभागप्रमुख विष्णू ठोंबरे, राजेंद्र देशमुख, शाखाप्रमुख प्रफुल्ल ठोंबरे, आशिष गायकवाड, राकेश मुळे, शांताराम गवसकर, नरेश रसाळ तसेच सरपंच बाळकृष्ण वाघमारे, उपसरपंच संजय देशमुख, सदस्य चंदन भारती, अतुल देशमुख, सदस्या राधिका देशमुख, प्रज्ञा देशमुख, रेश्मा ठोंबरे, सारिका पवार, सुप्रिया जोरकर, उषा रसाळ, ग्रामसेविका सखूबाई कुडाले आदी प्रमुखासह मोठया संख्येने ग्रामपंचायत हद्दितील ग्रामस्थ - महीला वर्ग उपस्थीत होता.

                 माणकीवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध प्रलंबित व नवीन विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी विद्यमान उपसरपंच संजय देशमुख, मा.सरपंच तथा विद्यमान सदस्य चंदन भारतीसह अन्य सदस्य यांनी आमदार महेंद्र थोरवेंकडे अनेकदा पाठपुरावा केल्याने आमदार थोरवेंनी माणकीवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांना 14 कोटीहुन आधिक रुपयाचा निधी दिल्याने यामधील काही कामांचे काम पूर्णत्वास गेली असता 25 जानेवारीला माणकीवली ग्रामपंचायत नवीन कार्यालयाचे उघ्दाटन आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते पार पडल्याने लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थांंमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तर यावेळी आमदार महेंद्र थोरवेंनी पुढे आपले मत मांडताना म्हणाले की,  माणकीवली ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांचा माझ्या विजयात खारीचा वाटा असल्याने त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ न देता मी प्रामाणिकपणे काम करत आपल्या ग्रामपंचायतीतील विकास कामांकरिता कोट्यावधीचा निधी दिला आहे तर यापुढेही अधिक निधी आपला ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबद्ध असेल असे मत थोरवेनी व्यक्त केले.


चौकट -
      आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी कर्जत - खालापूरचे नंदनवन करण्याचा घेतलेला ध्यासाच्या माध्यमातून माणकीवली ग्रामपंचायतीतील अनेक प्रलंबित विकास कामे मार्गी लागल्याने या विकास कामांच्या माध्यमातून माणकीवली ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास होतानाचे पाहायला मिळत आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमधील पाणी योजना, रस्ते, गटारे, स्मशानभूमी अशी अनेक विविध विकास कामे प्रगतीपथावर असल्याने आ.साहेबांचे मनापासून धन्यवाद.
चंदन भारती (सदस्य)


चौकट - 
         कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून माणकीवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामाकरता 15 कोटी हून अधिक निधी मिळाल्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या कामगिरीचे आम्ही ग्रामस्थ आभार मानतो तर यापुढील काळात आ.थोरवेनी दिलेल्या निधीतून सर्वसामान्यांची प्रलंबित विकास कामे मार्गी लावू.
संजय देशमुख (सरपंच)

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर