भारतीय जनता पार्टी खालापूर शहर आदिवासी चषकाचा मानकरी ठरला खालापूर शिरवलीवाडी संघ..
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : २९ जानेवारी,
भारतीय जनता पार्टी खालापूर शहराच्या वतीने खालापूर नगरपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवानसाठी भारतीय जनता पार्टी खालापूर शहर व किशोर दादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आदिवासी ७ क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धा खालापूर शहरात विनाशुल्क घेण्यात आल्या. तसेच सर्व खेळाडूंना क्रिकेट जर्सी व उत्तम जेवणाची सोय करण्यात आली होती.एकूण आठ संघांनी ह्यामध्ये सहभाग घेतला होता. ह्यामध्ये खालापूर शिरवली संघाने प्रथम क्रमांक तर वणवे वाडी संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. खालापूर शिरवली वाडी संघाचा अनिल पवार यास स्पर्धेचा सर्वोउत्कृष्ट खेळाडू म्हणून मॅन ऑफ द सिरीज सायकल देऊन गौरवण्यात आले तर उत्कृष्ट गोलंदाज वणवेवाडी संघाचा रोहित पवार तर वणवेवाडी संघाचा संदेश वाघमारे यास उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले.
ह्या स्पर्धेमध्ये कारसेवक दिनेश फराट यांचा प्रभू श्रीरामाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.स्पर्धेचे उदघाटन भारतीय जनता पार्टी कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षीस समारंभ माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या हस्ते करण्यात आले.ह्या स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, सनी यादव भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष, काशिनाथ पार्टे भाजपा अद्यात्मिक आघाडी जिल्हा संयोजक, प्रसाद पाटील कर्जत खालापूर विधानसभा युवा मोर्चा संयोजक, भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सुजाताताई दळवी, श्वेताताई मनवे, अनिल चाळके माजी सरपंच,ज्ञानेश्वर पारंगे बूथ अध्यक्ष धामणी,जयेंद्र पाटील, सचिन ओसवाल,पुंडलिकदादा लोते आदी उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी किशोरदादा म्हात्रे, दिपक जगताप भाजपा खालापूर शहर अध्यक्ष,अमीर पार्टे भाजपा खालापूर शहर उपाध्यक्ष,गणेश पारंगे भाजपा चिटणीस खालापूर शहर, शीतल वाघरे सरचिटणीस युवा मोर्चा खालापूर शहर भाजपा,रोहिदास पाटील भाजपा खालापूर शहर चिटणीस,लक्ष्मण जाधव बूथ अध्यक्ष भाजपा , प्रवीण पाटील बूथ अध्यक्ष भाजपा, जिग्नेश भानुशाली बुथ अध्यक्ष भाजपा, दत्तात्रय चाळके,हनुमंत पार्टे, सूरज पार्टे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मित्रपरिवार सतीश चव्हाण,तुषार म्हात्रे, गणेश सावंत, रवी वाघमारे, केतन गायकवाड, विलास पवार, अमोल पवार, अमीर खान यांनी मेहनत घेतली.
0 Comments