राजिप शाळा वडगांव येथे केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : ३१ जानेवारी
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव यांच्या माध्यमातून क्रिडा स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे अनावरण गृप ग्राम पंचायत वडगांव सरपंच गौरी गडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजगांव,वाशिवली, ईसांबे,बोरीवली,पौध या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणी आपली कौशल्य दाखविले,यामध्ये लंगडी,धावणे,कब्बडी,लिंबू चमचा,पोते उडी, बेडूक उड्या,दोरी उड्या अशा विविध स्पर्धां अयोजन करण्यात आले होते.
तसेच या स्पर्धेमध्ये कबड्डी मोठा गट मुले माजगाव विरुद्ध वडगाव शाळा यामध्ये वडगाव शाळेच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकविला,तर माजगाव च्या मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर लहान गटात वडगांव शाळेच्या मुलांनी प्रथम ,वाशिवली ठाकूर वाडीच्या मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर पौद आदिवासी वाडी शाळेच्या मुलांनी तृतीय क्रमांक पटकावला.तसेच या स्पर्धत जिंकलेले विद्यार्थांना सन्मानचिन्ह,सन्मापत्र शिक्षकांच्या हस्ते प्रधान करण्यात आले.
यावेळी सदस्य महादेव गडगे, केंद्रप्रमुख केंद्र माजगाव- जे. पी. परदेशी,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती- करुणा ठोंबरे,मुख्याध्यापक माजगांव - किरण कवाद,शिक्षक सुभाष राठेड,शिक्षिका सरस्वती कवाद,l वैजनाथ जाधव.किरण कवाद, रेखा जाधव,भूषण पिंगळे,मंगल मुंढे मॅडम,मस्तान बोरगे, दिव्या कडव,संतोष साळुंखे, रत्ना ठाणगे, संतोष गारगोटे सर, लता बाविस्कर-मोरे,रंजना वाघ, संतोष बडे,विकास शेळके, ठा.वा. दीपक अकोलकर,रवी राठोड,तसेच साउंड सिस्टम नरेंद्र जाभुळर यांनी केली.
0 Comments