दोन दिवस शेती विषयी प्रशिक्षण शिबीर,खोपोली रामेती येथे शेतक-यांनी घेतला लाभ
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १ फ्रेब्रूवारी,
तालुक्यातील बहुसंख्येने शेतकरी वर्ग शेती करीत आहे.मात्र शेतीमधून अधिक उत्पन्न मिळावे,यासाठी रासायनिक खताचा वापर केला जातो.परिणामी शेतीची प्रत खालावत चालली आहे,मात्र आपण सेंद्रिय खताचा वापर करून शेतीमधून अधिक उत्पन्न घेऊ शकतो.यासाठी तालुक्यातील शेतकरी वर्गांची खोपोली - रामेती येथे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी असंख्य शेतकरी वर्गांनी या शिबिरांचा लाभ घेतला.
दिवसेंदिवस शेती लागवड कमी होत चालली आहे.मात्र यांस अनेक कारणे निर्माण होत आहे.उत्पन्न घटने,मजुरांची मनधरणी, मातीत टाकलेला पैसा वसूल न होणे, बियाणे खते यांच्या विषय अल्प ज्ञान,रासायनिक खताचा बेसुमार वापर,औद्योगिक क्षेत्र,ओला,सुका दुष्काळ ,आदी सर्व बाबींमुळे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत आहे.मात्र लागवड क्षेत्र वाढले पाहिजे या उद्दात विचारांतून हे शिबीर राबविण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनील निंबाळकर यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत शेतकऱ्यांस दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांस नैसर्गिक शेती मिशन योजना,सेंद्रिय शेती,माती प्रशिक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच ग्रीन सर्ट येथून सुजित कैसारे यांनी सेंद्रिय प्रमाणीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.महा ऑरगॅनिक फार्म प्रॉड्युसर कंपनी पुणे येथील अनंत गव्हारे यांनी सेंद्रिय मालाचे बाजारपेठ, ब्रॅण्डिंग, पकेजिंग या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.त्याच बरोबर बी.टी एम. मोखाडा राहुल जोपळे - सेंद्रिय शेती का करावी? व कश्या प्रकारे करावी,तसेच सेंद्रिय निविष्ठा निर्माण कसे निर्माण करायचे या विषयी मार्गदर्शन केले.यावेळी तालुक्यातील कृषी शी संलग्न असलेले अधिकारी उपस्थित होते.
0 Comments