आम आदमी पार्टीने उठवला बेरोजगारांसाठी आवाज,पनवेल येथे आक्रोश मोर्चा....

 आम आदमी पार्टीने उठवला बेरोजगारांसाठी आवाज,पनवेल येथे आक्रोश मोर्चा....




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
पनवेल : ३० जानेवारी,

                नोकर भरती पेपर फुटी बाबत कार्यकर्ते  रस्त्यावर उतरले पहावयांस मिळाले,सरकारी नोकर भरती मधील पेपरफुटीचे सबळ पुरावे देऊनसुद्धा राज्य सरकारने काही प्रतिसाद देत नसल्यामुळे,याउलट सरकारने "सदोष तलाठीभरती" चा "सदोष" निकाल काही दिवसांपूर्वी लावला होता. राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी आप कडे साकडे घातले आहे.त्यामुळे आप चे कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरली असल्यांचे पहावयांस मिळाले, यावेळी पनवेल महानगर पालिका अध्यक्ष वैशाली कोळी यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

           सदर मोर्चा मध्ये आम आदमी पार्टीचे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील व रायगड जिल्ह्यातील सदस्य सहभागी झाले होते.
                  आप हे सातत्याने शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी नेहमी अग्रेसर असतेच आणि गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही,असे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी बोलतांना सांगितले. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर