खालापूरात दगडखाणीत ब्लास्टिंगमुळे नागरिक भयभीत. खालापूर शहर भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत कारवाईची मागणी..

 खालापूरात दगडखाणीत ब्लास्टिंगमुळे नागरिक भयभीत. खालापूर शहर भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत कारवाईची मागणी..





पाताळगंगा न्यूज :वृत्तसेवा 
खालापूर : २९ जानेवारी,


              डबर उत्खननासाठी दगड खाणीत सुरू असलेल्या ब्लास्टिंगचे हादरे खालापूर हद्दीतील आदिवासी वाडी आणि लगतच्या गावाला बसत असल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालय गाठत कारवाईची मागणी केली आहे. खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीतील सीमा रेषेवर दगडखाण असून काही अंतरावर शिरवली आदिवासी वाडी ,वणवे आदिवासी वाडी आहे. दगड खाणीत सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेले उत्खननासाठी  स्फोटकाचा वापर  होत असून  अधिक क्षमतेची स्फोटक वापरल्याचा परिणाम लगतच्या वाडीत घरांना हादरे बसणे ,भिंतीला तडे जाणे प्रकारात वाढ झाली आहे. 
              वयोवृद्ध, रुग्ण ,लहान मुलं  यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.  ब्लास्टिंग मुळे जमिनीखालील झ-याची दिशा बदलून विहीर तसेच बोअरवेलचा पाणीपुरवठा देखील बाधित  झाला आहे.भाजप शहराध्यक्ष दीपक जगताप यांच्या नेतृत्वाखाली    दिपक बोंदार्डे, शितल वाघरे सरचिटणीस युवा मोर्चा खालापूर शहर भाजपा,मनोहर पत्की, संतोष निधी,योगेश जाधव सरचिटणीस खालापूर शहर भाजपा , गणेश पारंगे चिटणीस खालापूर शहर भाजपा ,बाळू जाधव सह भयभीत नागरिकांनी एकत्र येत  खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांची भेट घेत लेखी तक्रार दिली आहे.  दगडखाण  तपासणी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर