हळदी कुंकू निमित्ताने महिलांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर, प्रसोल केमिकल्सचा पुढाकार

 हळदी कुंकू निमित्ताने महिलांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर, प्रसोल केमिकल्सचा पुढाकार



पाताळगंगा न्यूज : दिनेश पाटील
साजगांव : २ फ्रेब्रूवारी

            होनाड ग्रामपंचायत हद्दीतील प्रसोल केमिकल्स प्रा.ली.कंपनीच्या वतीने तीन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महिलांसाठी हळदी कुंकू निमित्ताने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पंधराशे महिलांनी आपल्या डोळ्याची तपासणी करून घेतली.ऑल फॉर आईज दवाखान्यातील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत करून घेतली.यावेळी कंपनीच्या शोभा शेट्टेण,स्मिता गोखले,सुप्रिया पाटील आरोही बेर्डे,रूपाली विचारे,पूजा साळुंखे,संगीता मारोथिया यांच्या हस्ते उपस्थित महिलांना हळदी कुंकू, वाण आणि भेटवस्तू देण्यात आली.      
             खालापूर तालुक्यातील साजगाव अडोशी विभागातील होनाड ग्रामपंचायत हद्दीत प्रसोल केमिकल्स ही कंपनी कित्येक वर्षे कार्यरत आहे.प्रत्येक वर्षी ही कंपनी आपली प्रगती करीत असताना या प्रगतीमध्ये स्थानिक नागरिकांचे मोठ सहकार्य लाभले असल्याने सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच समाजपयोगी कार्य करीत असते. तरुणांना रोजगार तर शैक्षणिक क्षेत्रात विध्यार्थ्यांना सहकार्य तसेच संस्कृतिक कार्यक्रमात या कंपनीचा मोलाच सहकार्य करते. 

                     यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होनाड ग्रामपंचायतीचे  सरपंच प्रकाश पाटील यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात प्रसोल कंपनीचा नेहमीच मदतीसाठी हात पुढे असतो त्यामुळे येथील गावाचा विकास होत आहे. त्यांनी या कार्यक्रमानिमित्ताने आज नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करीत महिलांच्या आरोग्याचाही विचार केला आहे.त्याच प्रमाणे कंपनीने महिलांच्या सक्षमीकरनासाठी अधिक लक्ष देत परिसरातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करावे असे विचार मांडले.
              तर कंपनीचे व्हाईस प्रेसिडंट विलास पाटील यांनी आपले विचार मांडताना आपली कंपनी छोटी होती त्या कंपनीला प्रगती पथावर नेण्यासाठी येथील स्थानिकांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे आम्हीही सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या रोजगारा साठी लवकरात लवकर योजना सुरु करू ज्यामुळे माझ्या सर्व भगिनी कर्तृत्वान बनतील असे वक्तव्य केले.

             या कार्यक्रमासाठी साजगाव  ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवले, होनाड ग्रामपंचायत सदस्य आशा पाटील, वर्षा पाटील,व्यवस्थापक सचिन प्रभू,उदयकुमार पाटणकर,योगेश पाटील,दर्शन पिंगळे,प्रवीण काळे यांसह कंपनीचा महिला स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर