चावणी ग्रामपंचायतच्या वतीने महिलांना आर्थिक साक्षरता आणि महिला सबलीकरण मार्गदर्शन शिबीर संपन्न ,महिलांनाचा हळदी कुंकू कार्यक्रमही उत्साहात संपन्न
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : २३ जानेवारी ,
खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चावणी ग्रामपंचायतच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू, आणि महिला सबलीकरण,व आर्थिक साक्षरता स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन शिबीर पार पडले, हे शिबिर गारमाळ येथे आयोजित करण्यात आले होते,
चावणी ग्रामपंचायत ही दुर्गम भागात येत असून येथील महिला सबलीकनासाठी ग्रामपंचायतच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्याच प्रमाणे हाही उपक्रम राबविला आहे, यावेळी महिलांसाठी आर्थिक साक्षरता, व स्वयंरोजगासाठी मार्गदर्शन शिबीर राबविण्यात आले यावेळी प्रमुख म्हणून साई प्रेरणा को ऑप .सोसायटीचे अध्यक्ष देविदास कोंडाजी डोंगरे आणि व्यवस्थापक कल्पेश अनिल भोपतराव यांनी महिलांना मार्गदर्शन केले
दुर्गभ भागातील महिलांनी पुढे येत स्वत स्वयंरोजगार उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे, कोणत्याही व्यवसायासाठी लागणारे आर्थिक पाठबळ आम्ही बचत गटाच्या माध्यमातून देऊन महिला सक्षमीकरनासाठी हातभार लावू असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले , तसेच यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी चावणी ग्रामपंचायतच्या सदस्या संगीता संदीप चिंचावडे ,प्राची पांडुरंग पाटील प्राथमिक शिक्षका सविता दारशेवाड, श्री समर्थ महिला बचत गट अध्यक्षा सुनंदा गबळू भोसले, ओम चैत्यन कानिफनाथ महिला बचत गट अध्यक्षा मनीषा हरिभाऊ कोंडभर,अबोली पाटील, ताई आखाडे आदींसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments