चावणी उंबरखिंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक, जगातील सर्वात पहिला शिवारांयांचा धनुष्यबाण असलेला अश्वारूढ पुतळा उभारणार - पालकमंत्री- उदय सामंत
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : ३ फ्रेब्रूवारी,
खालापूर तालुक्यातील चावणी (छावणी) येथे असलेल्या उबरखिंडित छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात असलेले धनुष्यबाण व पाठीवर भात्यात ठेवलेले बाण असलेल्या भव्य अश्वारूढ पुतळा आणि आजूबाजूच्या परिसरातील सुशोभीकरनासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच मंजुरी मिळवून कामाचे भूमीपूजन करणार असल्याची माहिती उधोग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे,
२ फेब्रुवारी रोजी उंबरखिंड येथे ३६३ वा विजयदिन मोठ्या उत्साहात पार पडला,यावेळी अनेक कलाकार,शाहिरांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री उदय सामंत यांनी खालापूर तालुक्यातील उबरखिंड येथील विजय स्तंभाला अभिवादन केले यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या उबरखिंड इतिहास जागृत राहावा यासाठीच्या मागणीचा सकारात्मक विचार करून मागणी मान्य केली आहे,
येथे शिवरायांचा देशात कुठेही आजपर्यंत उभारला गेला नाही अशा पध्दतीचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे, या पुतळ्यावर विराजमान झालेले छत्रपतींच्या हातात धनुष्यबाण आणि पाठीवर भात्यात ठेवलेले बाण दाखविले जाणार आहे, तसेच येथील परिसराचे सुशोभीकरण करण्याचा संकल्प केला आहे,
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उबरखिंडीच्या इतिहासाची ओळख खरोखरच सुवर्णक्षरात मांडण्याचा संकल्प केला आहे, तर येथे शिवरायांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे, देशातील शिवरायांचा पुतळा असा असेल की या पुतळ्यावर विराजमान झालेल्या शिवरायांच्या हातात धनुष्यबाण व पाठीवर भात्यात अडकवलेले बाण असतील या कामाला मंजुरी मिळून लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे,
प्रतिक्रिया -
चावणी उबरखिंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी मंजूर केल्याने ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री आणि आमदार साहेबांचे मनापासून आभार मानले आहेत तर काम झाल्यावर येथील मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या या मागण्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले आहे,
बाळासाहेब आखाडे
सरपंच -चावणी ग्रामपंचायत
0 Comments