माघी गणपती उत्सवात, स्वामी समर्थ मित्र मंडळ खालापूर यांच्या वतीने गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा

 माघी गणपती उत्सवात, स्वामी समर्थ मित्र मंडळ खालापूर यांच्या वतीने गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : १५ फेब्रुवारी,

          गणपती उत्सव हा मराठी महिन्यातील माघ महिन्यात येत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा करण्यात येत असतो.विशेष करून ग्रामीण भागातील तरुण वर्ग हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्याची एक वेगळीच परंपरा आहे,काही ठिकाणी गणरायांची मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती.खालापूर श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ कडून,बाप्पाचे आगमन झाले.तसेच दिड दिवशी भक्तीभावाने विसर्जन करण्यात येणार आहे.
                या उत्सवाच्या निमित्ताने दिवस भर विविध कार्यक्रमाची रेलचेल सुरुच होती. खालापूर शहरात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करतांना, आध्यत्मिक हरिपाठ, भजनसेवा,पारंपारिक महिला नृत्य, लहान मुलांसाठी नृत्य, संगीतखुर्ची अश्या विविध प्रकारचे कार्यक्रम मंडळाकडून करण्यात आहे.
            तसेच दुसऱ्या दिवशी श्रीचीं भव्य मिरवणूक काढून गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments

शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस सुरू करा. अन्यथा आंदोलन करणार : आप